‘अरे मंगळावरून आलाय काय?’ उबर ऑटोचं बिल साडेसात कोटी; Video व्हायरल

नोएडा येथे राहणाऱ्या दीपक तेंगुरीया यांनी उबर इंडियाच्या माध्यमातून (uber auto fare) उबर ऑटो बुक केला होता. शहरात प्रवास करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण ओला, उबर सारख्या सेवांचा वापर करतात. मात्र यांचा वापर करताना ग्राहकांना कधीकधी विचीत्र प्रसंगांना समोरे जावे लागते. असाच काहीसा प्रकार नोएडा येथील एका उबर ग्राहकासोबत घडला आहे.

शुक्रवारी नोएडा येथे राहणाऱ्या दीपक तेंगुरीया यांनी उबर इंडियाच्या माध्यमातून (uber auto fare) उबर ऑटो बुक केला होता. या प्रवासासाठी त्यांनी फक्त ६२ रुपये भाडे देणे अपेक्षित होते. मात्र जेव्हा राईड संपल्यानंतर ॲपमध्ये बील समोर आलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. दीपक हवे त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ड्रायव्हरने त्यांची राईड संपवण्याआधीच त्यांच्या ॲपवर 7.66 कोटींचे बिल मिळालं. दीपक यांचा मित्र आशिष मिश्रा यांना शुक्रवारी याबद्दलची व्हिडीओ क्लीप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये दोघे त्यांना मिळालेल्या बिलाबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये दीपक हे बिल किती आलं असं मित्राला विचारतात आणि त्यांचा मित्र सांगतो ७,६६,८३,७६२ रुपये. या व्हिडीओत फोनची स्क्रिन देखील कॅमेऱ्यात दिसते. यामध्ये दीपक य़ांना १,६७,७४,६४७ रुपये फेअर टीप म्हणून आकारण्यात आले आहेत. तर वेटिंग टाईम कॉस्ट म्हणून ५,९९,०९१८९ रुपये तर ७५ रुपये प्रोमोशन कॉस्ट म्हणून कापण्यात आले आहेत.

या व्हिडोओत दोघे मित्र या प्रचंड बिलावर चर्चा करताना ऐकू येत आहे . दरम्यान ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एक्स वरील उबर इंडियाच्या कस्टमर सपोर्ट अकाउंटवरून या ग्राहकाची माफी मागण्यात आली आहे. तसेच त्यांनी झालेल्या प्रकाराची चौकशी केली जाईल असेही सांगण्यात आले . यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीना येथील उबर ड्रायव्हरने ३० टक्के राईड्स कॅन्सल करून एका वर्षात २८,००० डॉलर (२३.३ लाख) कमावले होते.

हेही वाचा:

‘ओपनएआय’ कडून आता ‘व्हॉईस क्लोनिंग’

बागेश्वर बाबांना 4 वाजेपर्यंत अटक करा, अन्यथा कायदा व्यवस्था बिघडू शकते

कार गरागरा फिरली अन् ड्रायव्हर थेट आकाशात; रोहित शेट्टीचा चित्रपटही ठरेल फेल