बायकोशी वाद.. चिडलेल्या जावयाने सासुच्या दुचाकीसह १५ गाड्या पेटवल्या

पुणे शहरातील गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत(wife). शहरात कोयता गँगची दहशत, गाड्यांची तोडफोड, जाळपोळ अशा घटना सर्रास घडताना दिसत आहेत. अशातच बायकोशी झालेल्या वादानंतर एका तरुणाने तब्बल १५ गाड्या पेटवल्याची घटना शहरातील सिंहगड रोड परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बायकोसोबत(wife) झालेल्या वादातून सासरवाडीत आलेल्या जावयाने सासूच्या दुचाकी गाडीसह सासुरवाडीतील रस्त्यावर पार्क केलेल्या तब्बल 15 दुचाकी पेटवल्याची घटना समोर आली आहे. पुण्यामधील सिंहगड रस्त्यावर असलेल्या वडगाव बुद्रुक येथील ज्ञानगंगा इमारती समोरील पार्किंग मधील ही घटना आहे. गणेश दिनकर दहिभाते (वय ३५) असे गाड्या पेटवणाऱ्या जावयाचे नाव आहे.

याबाबत महिला फिर्यादीने आपल्या जावयाविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी गणेश दहिभाते यांनी त्याच्या पत्नीसोबत वाद केला होता. या वादातून फिर्यादी महिलेला आरोपीने हानी पोहोचावे या उद्देशाने जाणीवपूर्वक फिर्यादीची आणि शेजारी असलेल्या पंधरा गाड्या पेटवल्या.

दरम्यान, या धक्कादायक घटनेने सिंहगड रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या जाळपोळ प्रकरणी आरोपी गणेश दिनकर दहिभाते याच्यावर सिंहगड रोड पोलिसात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

‘श्रीवल्ली’ची 100 किलोंची डेडलिफ्ट पाहून चाहते थक्क!

मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट

‘पुष्पा द रुल’मधलं पहिलं गाणं रिलीज, भन्नाट हूकस्टेप्स पाहून तुम्हीही थिरकाल