लहान मुलाला विचारलं, तरी त्याला माहिती आहे की नवनीत राणा पडणार; बच्चू कडू

सट्टा बाजारात भाव कोणाचेही असू द्या, अमरावती लोकसभेला आम्हीच(political marketing) बाजी आम्हीच मारू, असा आत्मविश्वास प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेचा निकाल आमच्याच बाजूने राहील, मतपेटीचा भाव आमचाच राहिलं, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.

दरम्यान, अमरावीमधील भाजप(political marketing) उमेदवार नवनीत राणा यांच्यावरूनही बच्चू कडू यांनी जोरदार ‘प्रहार’ केला. रवी राणा मुळेच नवनीत राणा पडणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.

बच्चू कडू म्हणाले की, लहान मुलाला जरी विचारलं तरी त्याला माहिती आहे की नवनीत राणा पडणार आहे.. रवी राणामुळेच नवनीत राणा अमरावती लोकसभेला पडणार आहेत. दोन वर्षे जर रवी राणा चूप राहिला असता, तर आज चित्र वेगळं राहिलं असतं, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला.

हेही वाचा :

धावत्या दुचाकीवर प्रेमीयुगुलांचा रोमान्स…पोलिसांनी पाहिलं अन्…Video

विको कंपनीचे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचे वयाच्या 85व्या वर्षी निधन

शिखर धवन पुन्हा एकदा अडणार विवाहबंधनात? मिताली राजशी…