जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद

 जून महिन्यामध्ये जर तुम्ही बँकेमध्ये काही कामासाठी जाण्याचा (Banks)प्लान करत असाल तर बँकेत जाण्यापूर्वी बँकांच्या सुट्ट्यांची यादी जरूर वाचा. जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही.मे महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. मे महिना संपून उद्यापासून जून महिन्याला सुरूवात होणार आहे. जून महिन्यात तुम्हाला देखील बँकेशीसंबंधित काही महत्त्वाची कामं असतील. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी कोणत्या दिवशी बँक सुरू आहे आणि कोणत्या दिवशी बंद राहील हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे राहिल. अशामध्ये जून महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जून २०२४ मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे.

जून महिन्यामध्ये जर तुम्हाला बँकेशी संबंधित काही कामं (Banks)असतील तर ते तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण करा. कारण या महिन्यामध्ये १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  जारी केलेल्या जून महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, जूनमध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहतील. जर तुम्हाला या महिन्यात बँकेशी संबंधित काही कामं करायची असतील तर सुट्टयांची यादी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला कोणत्या दिवशी आणि कोणत्या राज्यांमध्ये या महिन्यामध्ये बँका बंद राहतील हे सांगणार आहोत…

बँकांच्या सुट्ट्यांची ही यादी आरबीआयने राष्ट्रीय स्तरावर जारी केली आहे. विविध राज्यांमध्ये येणाऱ्या अनेक सणांच्या व्यतिरिक्त शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही बँकेत जाण्याचा प्लान करत असाल तर ही यादी एकदा ()पाहून जाल जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. नाही तर बँकेत जाऊन तुमचे काम होणार नाही आणि तुमच्या वेळेसोबत तो दिवसही वाया जाईल.

जूनमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी –

1 जून 2024 – या दिवशी देशातील काही ठिकाणी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान असल्यामुळे बँका बंद राहतील.

2 जून 2024- रविवार असल्यामुळे देशभरातील बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

8 जून 2024- महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

9 जून 2024 – रविवारमुळे बँका बंद राहतील

16 जून 2024- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

22 जून 2024- महिन्याच्या चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

23 जून 2024- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

30 जून 2024- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

हेही वाचा :

भयंकर १५ वर्षीय मुलीने वडिलांसह लहान भावाला संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन् फ्रीजमध्ये ठेवले

पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर

राहुल गांधींचं ट्विट, सांगितला लोकसभेचा निकाल; मोदींनाही काढला चिमटा