मोठी बातमी! आता या लाडक्या बहिणींचे १५०० रुपये कायमचे बंद

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.लाडकी बहीण योजनेचा आता वर्षपूर्ती झाली आहे.(important)या योजनेतून आता जवळपास ८० हजार महिलांचे अर्ज बाद केले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातील हजारो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे या महिलांना आतापासून १५०० रुपये मिळणार नाहीत. या योजनेत आता हजारो लाडक्या बहि‍णींना फटका बसला आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. (important)या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर या निकषांबाहेर जाऊन जर कोणी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. दरम्यान, यासाठी पुन्हा पडताळणी सुरु करण्यात आली आहे.आयकर विभागाकडून महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे.यातून ज्या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये.जालना, नागपूर, यवतमाळमधील अनेक महिलांचे अर्ज बाद केले आहेत.

जालना जिल्ह्यातील तब्बल ५७ हजार अर्ज बाद करण्यात आले आहेत. या जिल्ह्यात एकूण ५ लाख ४२ हजार ३९२ अर्ज दाखल झाले होते.यातील हजारो महिलांचे अर्ज बाद केले आहेत.(important)नागपूरमधील ३० हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. हे अर्ज प्राथमिक पडताळणीत बाद झाले आहेत. या योजनेत लाडक्या बहि‍णींच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे.यामध्ये कर भरणारे, सरकारी कर्मचारी असणारे, इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत.अमरावतीमधील २१ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते.यवतमाळमधीलदेखील २७ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे या महिलांना आता इथून पुढे योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत.

हेही वाचा :