अभिनेत्री प्रियंका चोप्राचा एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अपघात

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असते. पती निक जोनास आणि मुलगी मालती(accident) मेरीबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. यासोबत ती आपल्या आगामी चित्रपटांचीही माहिती चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या प्रियंका चोप्रा आपल्या आगामी ‘द ब्लफ’ या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये वस्त आहे. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान प्रियंका चोप्राचा अपघात झाला. यात तिच्या मानेला दुखापत झाली आहे.

प्रियंका चोप्रा सध्या ऑस्ट्रेलियात ‘द ब्लफ’ या चित्रपटाचं शुटिंग(accident) करतेय. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा एक फोटो प्रियंका चोप्राने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोत प्रियंका चोप्राच्या मानेवर मोठी जखम झालेली दिसतेय. या फोटोला तीने एक कॅप्शन दिलाय. यात तीने म्हटलंय, ‘हा माझ्या व्यवसायातील एक मोठा धोका आहे’ पुढे तीने ही जखमी आपल्याला शुटिंगदरम्यान झाल्याचं म्हटलं आहे. प्रियंकाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्रियंका चोप्रा ‘द ब्लफ’ या चित्रपटात समुद्री डाकूची भूमिका साकारत आहे. आपल्या कुटुंबासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी असणाऱी ही व्यक्तीरेखा आहे. या चित्रपटात कार्ल अर्बन हा अभिनेता मुख्य भूमिका साकारतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन फ्रँक ई प्लावर्स हे करत आहेत. ‘द ब्लफ’ या चित्रपटाचं शुटिंग सुरु होण्याआधी प्रियंका चोप्राने चित्रपटातील कलाकार आणि क्रु मेंबरबरोबर एक पार्टी केली होती. या पार्टीचा व्हिडिओ प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर शेअर केला होता.

या व्हिडिओला तीने एक पोस्टही शेअर केली होती. यात तीने म्हटलं होतं ‘ जेव्हा मी एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करते तेव्हा माझ्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की जे लोक एकत्र येतात ते सर्वोत्कृष्ट आहेत. आम्ही आमच्या कुटुंब आणि घरापासून दूर एकत्र वेळ घालवतो. ज्या कामासाठी आपण योगदान देत आहोत त्या कामाचाच आपण विचार करतो आणि जगतो.

प्रिंयका चोप्रा ‘लव्ह अगेन’ या चित्रपटात शेवटची दिसली होती. आता तिचा ‘हेड्स ऑफ स्टेट’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटात जॉन सीना आणि इदरीस इल्बा सारखे दिग्गज आहेत. याशिवाय प्रियंका ‘सिटाडेल-2’ मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींना 5 लाखांपर्यंतचे उपचार फ्री; CM शिंदेंची घोषणा

सकाळी 9 वाजण्यापूर्वी सुरु होणाऱ्या शाळांनाच होणार शिक्षा?

देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय