बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड

बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक(director) सिकंदर भारती यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. सिकंदर भारती यांचे निधन २४ मे रोजी झाले आहे. नेमका त्यांचा मृत्यू कसा काय झाला? अद्याप हे कळू शकलेलं नाही. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीत शोक व्यक्त केला जात आहे.

बॉलिवूड सिनेदिग्दर्शक सिकंदर(director) भारती यांच्या पार्थिवावर आज (२५ मे) सकाळी ११ वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी पिंकी आणि तीन मुले सिपिका, युविका आणि सॉक्रेटिस असा परिवार होता.

‘घर का चिराग’, ‘जालीम’, ‘दस करोड रुपये’, ‘भाई भाई’, ‘सैनिक सर उठा के जियो’, ‘दंडनायक’, ‘रंगीला राजा’, ‘पोलिस वाला’ आणि ‘दो फंटूश’ यांसारख्या हिट चित्रपटाचे दिग्दर्शन सिकंदर भारती यांनी केलेले आहे. सिकंदर यांनी राजेश खन्ना, शाहरुख खान, अक्षय कुमार आणि गोविंदा यांसारख्या बड्या कलाकारांसोबत काम केले आहे.

हेही वाचा :

भाजप उमेदवारावर ‘या’ राज्यात हल्ला,लोक दगडाचा मारा करत होते;

इस्रायली महिलेशी हमासच्या बाप-लेकाचे राक्षसी कृत्य; आधी वडिलांनी मग लेकाने बलात्कार केला.

महापालिकेने दर्शवला धोक्याचा डेंजर झोन, पुरग्रस्तांसाठी पूर्वसूचना