अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप? मलायका अरोराने रिलेशनशिप स्टेटसचा केला खुलासा

बॉलीवडू स्टार मलायका अरोरा तिच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या ब्रेकअपमुळे(Break up) चर्चेत आहे. मलायकाचा एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने स्वतःला सिंगल म्हणून ब्रेकअपला दुजोरा दिला आहे. तेव्हापासून मलायका सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत असते.

आता मलायकाने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत तिच्या रिलेशनशिप(Break up) स्टेटसचा खुलासा केला आहे. तिची पोस्ट व्हायरल होत आहे. मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिची सध्याची स्थिती काय आहे, हे सांगितले आहे. मलायकाने पोस्टमध्ये लिहिलंय की, माझं स्टेटस आता आहे. यामध्ये तीन पर्याय दिले आहेत. पहिली- मी रिलेशनशिपमध्ये, दुसरी- सिंगल आणि तिसरी- हीहीही. ही पोस्ट अजूनही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आहे. मलायकाने ही पोस्ट शेअर करताना काहीही लिहिलेले नाही.

अर्जुन कपूरने मागील महिन्यात दिवाळी पार्टीत त्याच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं होतं. गेल्या महिन्यात सिंघम अगेनच्या प्रमोशनदरम्यान या चित्रपटातील स्टार्सनी एका दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. यादरम्यान अर्जुनसमोर मलायकाच्या नावाने घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर पापाराझींशी बोलताना अर्जुन कपूर म्हणाला होता, मी आता सिंगल आहे. मागील काही दिवसांपासून मलायका आणि अरबाजचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु दोघांकडून कोणतीच अधिकृत घोषणा झाल्याचं समोर आलं नव्हतं.

मलायका आणि अर्जुन 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. सुरुवातीला दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगले, पण नंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांनी या नात्याला अधिकृत केलंय. त्यानंतर दोघेही नेहमी एकत्र दिसले. मलायका आणि अर्जुनचे एकत्र फोटो रोज व्हायरल होत असत. मलायकाने अभिनेता-निर्माता अरबाज खानसोबत लग्न केलं होतं. या जोडप्याला एक मुलगा अरहान देखील आहे. मलायका आणि अरबाज लग्नाच्या 19 वर्षानंतर वेगळे झालेत.

हेही वाचा :

बिडी न दिल्यामुळे थेट जिवलगावरच चाकूने हल्ला…

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? दिल्लीत होणार महत्वाची बैठक

चिन्ह गोंधळाचा फटका पिपाणीने तुतारीसारखी वाजवली बाजी शरद पवार गटाचे 9 उमेदवार पराभूत