काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रूग्णालयात दाखल करणार

मुंबई : नव्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा एक दिवसावर येऊन ठेपलेला असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील ज्युपिटर हॉस्पिटमध्ये(hospital) दाखल करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या चार दिवसांपासून शिंदेंना ताप आणि अशक्तपणा जाणवत होता.

यामुळे त्यांच्या नियोजित भेटीगाठीदेखील रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरीच उपचार केले जात होते. मात्र, त्यानंतरही शिंदे यांना बरं वाटत नसल्याने आता त्यांना पुढील उपचारांसाठी ज्युपिटर रूग्णालयात (hospital) दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदेंना दोन दिवस आराम करण्याता सल्ला डॅाक्टरांनी दिला आहे. त्यांची डेंगी, मलेरिया याची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना सध्या अशक्तपणा जाणवत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॅाक्टरांनी सांगितले.

दरम्यान शिंदे यांची प्रकृती पूर्णपणे बरी नसली तरी अहवाल निगेटिव्ह आल्याने डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला. तर दुसरीकडे शिंदे नव्या सरकारमध्ये रुजू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारमध्ये राहावे, अशी शिवसेना खासदारांची इच्छा आहे. अशा परिस्थितीत शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारू शकतात.

बुधवारी मुंबईत होणाऱ्या भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत फडणवीस यांच्या नावावर मंजुरीची शिक्कामोर्तब होणार आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मता सीतारामन यांना निरीक्षक बनवण्यात आले आहे.

दुसरीकडे, नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी आजारपणामुळे सर्व बैठकी रद्द केल्या आहेत. महायुतीच्या नेत्यांची पुढील बैठक कधी होणार हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. मात्र, सध्या सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपची सभा आयोजित करण्याची प्रतीक्षा असल्याचे शिवसेनेच्या बाजूने बोलले जात आहे.

शिंदे गटाकडून नव्या सरकारमध्ये गृहमंत्रालयासह बड्या मंत्र्यांची मागणी होत असून महाराष्ट्र मंत्रिमंडळ विभाजनावर अडकला असल्याची चर्चा आहे. मात्र, महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असल्याची ग्वाहीही शिंदे देत आहेत. या सगळ्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज पुन्हा दिल्लीत येत असून, ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

भाजप नेते गिरीश महाजन यांना यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, ‘मी एकनाथजींना 30 वर्षांपासून ओळखतो. छोट्या-छोट्या बाबींवर नाराजी, राग, मतभेद असे काही नाही. आमचे ज्येष्ठ नेते देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथजी यावर निर्णय घेतील. आम्ही सुमारे दीड तास अतिशय सकारात्मक वातावरणात चर्चा केली. तीनही आघाडी पक्ष येत्या पाच वर्षांसाठी एकत्र काम करतील.

हेही वाचा :

स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधू लवकरच अडकणार लग्नबंधनात

दोघांची भांडण तिसऱ्याचा लाभ? मुख्यमंत्री ठरत नसताना अजित पवारांची दिल्लीवारी

‘तुझ्या आई-वडिलांना जीवे मारेन…’, 13 वर्षांच्या मुलीवर आजोबांकडून लैंगिक अत्याचार