चीनचा प्रसिद्ध धबधबाही निघाला बनावट.

युंटाई पर्वतामध्ये असणारा युंटाई धबधबा(waterfall) हा आशियातील सर्वात उंच धबधबा मानला जातो, पण त्या धबधब्यामागचे खरे सत्य आता जगासमोर आले आहे. चीनच्या हेनान प्रांतात स्थित 314 मीटर- उंच या धबधब्याला युनेस्कोने ग्लोबल जिओपार्क म्हणून घोषित केले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक तेथे भेट देत असतात. पण हा धबधबा खरा नसून त्यातून पाईपमधून पाणी सोडण्यात येत आहे. असा व्हिडीओ सोशल माध्यमांवर फिरत आहे.  या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने स्पष्टीकरणही जारी केले आहे. एका पर्यटकाने जवळच्या धरणाच्या खडकात बांधलेल्या पाईपमधून युंटाई माउंटन फॉल्समधून पाणी वाहत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केल्याने वाद सुरू झाला.

बीबीसीच्या वृत्तानुसार, धबधब्यामध्ये पाईपने पाणी सोडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. यानंतर ही व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात लोकांनी शेअर केली आहे. युंटाई टुरिझम पार्कच्या संचालकांनी सांगितले की, पावसाअभावी धबधब्याचे कमी झालेले आहे. त्यामुळे धबधबा सुरु ठेवण्यासाठी पाईपची मदत घेण्यात आली आहे, जेणेकरून येथे कमी पाणी पाहून पर्यटकांची निराशा होऊ नये.

धबधब्याचा व्हिडिओ कसा झाला व्हायरल ?

चिनी सोशल मीडियावर एका यूजरने धबधब्याचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये पर्यटक युंटाई धबधब्याच्या शिखरावर एका मोठ्या पाईपवर चढलेले आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘युंटाई फॉल्सच्या उगमापर्यंत फक्त एक पाईप पाहण्यासाठी मी या सर्व अडचणींचा सामना केला आहे.’ यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी युंटाई धबधब्यातून पाणी पडण्यामागे काही पाईप्स कारणीभूत असून ही पर्यटकांची फसवणूकआहे? असा सवाल उपस्थित केला आहे.

या घटनेनंतर स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांना उद्यानात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यानंतर धबधब्याची काळजी घेणाऱ्या लोकांनी सांगितले की, जेव्हाही पर्यटक इथे येतील तेव्हा त्यांना सर्वात सुंदर दृश्य पाहायला मिळावे. अशी आमची इच्छा आहे. अशा परिस्थितीत उन्हाळी हंगामात पर्यटकांना चांगले वाटावे, म्हणून एक छोटीशी सुधारणा करण्यात आली. पार्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते स्प्रिंगमध्ये पाणी पंप करण्यासाठी वापरलेले पाणी स्प्रिंग वॉटर होते. यामुळे नैसर्गिक लँडस्केपला कोणतीही हानी होणार नाही.

हेही वाचा :

10 ते 14 जूनपर्यंत संपूर्ण राज्य मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज

ACB ने PSI सह पोलिसाला उचलले शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना.

देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिल्यास उपमुख्यमंत्रीपदी शंभूराज म्हणाले…