ठाकरेंच्या उमेदवाराला शह देण्यासाठी CM शिंदेची मोठी खेळी

नाशिकमध्ये गेले कित्येक दिवस महाविकास आघाडी आणि महायुतीत जागेचा(support) तिढा सुरू होता. त्यानंतर आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शिवसेना शिंदे गट ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत नाशिक शहरासह जिल्ह्यातील ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या २ ते ३ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.

तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात(support) प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, माजी जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्यांसह अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कालच ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर ठाकरे गटातील आणखी पदाधिकाऱ्यांचे शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.

नाशिकमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा प्रचाराचा धडाका नाशिकमध्ये सुरू आहे. अशातच अनेक नेते पक्षाची साथ सोडत असल्याचं दिसत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये ठाकरे गटातील नेत्यांचं गाळप सुरू असल्याचं दिसत आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं समोर आलं आहे. नाशिकमध्ये पुन्हा ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठाकरे गटाने नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे विजय करंजकर नाराज असल्याने त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. आताही ठाकरे गटाचे आणखी काही पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदेंनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मोठी खेळ खेळल्याचं बोललं जात आहे. आता आणखी कोणते पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

क्रिकेट विश्वात खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट

काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड; भाजपवर गंभीर आरोप

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर