महाराष्ट्रात रंगीत राजकारण; अजित पवार यांच्या गुलाबी रंगावर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी
राज्याचे उपमुख्यमंत्री(politics) अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने गुलाबी रंगांतून कॅम्पेनिंग सुरू केल्यानंतर राज्यात गुलाबी रंगाची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाबी रंगावरुन अजित पवार रंगीत टोलेबाजी केली आहे. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील रंगीत राजकारणात उडी घेतली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी(politics) पत्रकाराशी अनौपचारीक चर्चा करताना मला गुलाबी होण्याची गरज नाही.. माझ्या कपड्यांचा रंग पाढरा आहे.. तो कोणत्याही रंगाला फिका करू शकतो कोणत्याही रंगात मिसळू शकतो असं विधान केलं.. त्यावर मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच आहे. पांढरा रंग चांगला आणि स्वच्छ आहे.. असं मिश्किल उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं.
या सरकारचा रंग आणि कारभार काळाच असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय.. तर तुम्ही फक्त हिरव्या रंगात रंगा, औरंगजेब झिंदाबाद बोला आणि पाकिस्तान झेंडे घेऊन रॅली काढा असा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर केलाय..
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील वातावरण आतापासूनच तापायला सुरूवात झालीय.. त्यात नेत्यांनी रंगांवरून केलेल्या टिका टिपण्णीवरून जोरदार धुरळा उडाल्याचं पाहायला मिळतंय.. निवडणूक जशी जवळ येईल तसे अजूनही काही रंग पाहायला मिळण्याची शक्यताय.
हेही वाचा:
अरविंद केजरीवालांनी एका दगडात तीन पक्षी मारले; राजीनामा देण्याचं नेमकं कारण काय?
विराट कोहलीच्या रॉकेट शॉटने मोडली स्टेडियमची भिंत, जोरदार सिक्स पाहून प्रेक्षक हैराण
संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत