कोल्हापूर जिल्ह्यातील ‘या’ चार मतदारसंघात भावांच्या तुलनेत लाडक्या बहिणी सर्वाधिक मतदान करणार!
लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवला सामोरे गेल्यानंतर महायुतीने(political) खडबडून जागे होताना अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली. त्याचबरोबर निवडणुकचीच्या तोंडावर 1200 हून अधिक शासन निर्णय जारी केले आहेत. यामध्ये सर्वाधिक लाडकी बहिण योजना चर्चेमध्ये आहे. याच योजनेच्या माध्यमातून आगाऊ हप्ते महायुती सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यातील महिला मतदार वर्ग लाडकी बहीण योजना डोळ्यासमोर ठेवून आपल्यालाच मतदान करेल असा विश्वास महायुतीमधील नेत्यांमध्ये आहे.
दरम्यान, योजना जरी महायुती(political) सरकारकडून देण्यात आली असली तरीसुद्धा योजनेच्या श्रेय वादावरून सुद्धा महायुतीमध्ये वादाच्या ठिणग्या पडल्या होत्या. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आपली असल्याचे सांगितले. अजित पवार गटाकडूनही स्वतंत्र पद्धतीने प्रचार करण्यात आला, तर भाजपकडून सुद्धा प्रचार करण्यात आला.
त्यामुळे योजना जरी एक असली तरी तीन पक्ष श्रेयवादावरून समोर आल्याचे दिसून आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आता राज्यातील लाडक्या बहिणी कोणाच्या पारड्यात मतं टाकणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. याचे उत्तर 23 नोव्हेंबर रोजीच मिळणार आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या चार मतदारसंघांमधील महिला कोणाला कौल देणार? याची उत्सुकता असेल. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, कागल, कोल्हापूर उत्तर आणि शिरोळ या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये महिला कोणाला साथ देणार? याची उत्सुकता आहे.
चंदगड मतदारसंघ महायुतीमध्ये अजित दादांच्या वाटेला असून त्या ठिकाणी विद्यमान आमदार राजेश पाटील रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नंदाताई बाभुळकर रिंगणामध्ये आहेत. कागलमध्ये सुद्धा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शरदचंद्र पवार पक्षाचे समरजीतसिंह घाडगे यांच्यामध्ये तगडा मुकाबला आहे.
कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदे गट आणि काँग्रेसमध्ये लढत आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे राजेश लाटकर असणार आहेत. शिरोळमध्ये काँग्रेसचे गणपतराव पाटील यांची लढत राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यात असणार आहे. यड्रावकर यांनी त्यांच्याच पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना शिंदे गटाकडून पाठिंबा मिळतो का? याकडे लक्ष असेल.
हेही वाचा :
हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडने पहिल्या पत्नीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! पोस्ट व्हायरल
शिखर धवनलाही लागलं लड्डू मुत्त्या बाबांच वेड, फिरता पंखा थांबवत दिला आशीर्वाद, Video Viral
निवडणूक जिंकली, तरीही CMपद जाणार; शिंदेंना धक्का? महाशक्तीचा नवा फॉर्म्युला ठरला