“दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही”; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण बॉलिवूडचं(chemistry) पावर कपल आहे. रिअल लाईफमध्ये या जोडप्याने ‘राम-लीला’,’बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांची ऑन-स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. रणवीर आणि दीपिकाने काही महिन्यांपूर्वी चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. अशातच आता रणवीरने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की,”दीपिकाला त्याच्यासोबतची केमिस्ट्री पसंत नव्हती”.
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत 2015 मध्ये रणवीर म्हणाला होता,”दीपिका पादुकोणचा(chemistry) बॉलिवूडमध्ये चांगलाच बोलबाला आहे. बाजीराव मस्तानीमध्ये मला दीपिकासोबत काम करण्याचं सौभाग्य मिळालं. या चित्रपटात आमचे इंटेंस रोमँटिक सीन आहेत. पण दीपिका असा विचार करत नाही. मला वाटतं की, आमची केमिस्ट्री खूपच चांगली आहे. दीपिकाला वाटतं की मी अनुष्का शर्मासोबत जास्त चांगला वाटतो. तर मी रणबीर कपूरसोबत जास्त चांगली वाटते”.
दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी ‘तमाशा’मध्ये दीपिका आणि रणवीरसोबत काम केलं होतं. मुलाखतीत इम्तियाज अली यांनी तमाशातील भावनिक क्लायमॅक्सवर चर्चा केली.
इम्तियाज अली पुढे म्हणालेले,”रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण रिलेशनमध्ये असल्याचं लोकांना वाटायचं. पण खरंतर कलाकार एकमेकांच्या कामावर प्रेम करत असतात. ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. दीपिका आणि रणबीरला एकत्र काम करायला आवडतं. त्यामुळे त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती”.
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण सध्या चर्चेत आहेत. दोघे लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिकाचा फायटर हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. आता दीपिकाचा ‘कल्कि 2898 एडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत प्रभास आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. दुसरीकडे रणवीरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
हेही वाचा :
लालू प्रसाद यांच्या मुलाने आपल्याच कार्यकर्त्याला स्टेजवरुन ढकललं खाली Video
निवडणुकीनंतर बसणार धक्का, 50 ते 250 रुपयांनी महागणार मोबाईल रिचार्ज !
टी-20 वर्ल्ड कपच्या शेड्यूलमध्ये गडबड, 24 तासांपेक्षा कमी अंतरात सेमीफायनल अन् फायनल?