पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ

नाशिक लोकसभा मतदारसंघात सोमवारी(monday) दि.20 मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असून नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून आला आहे. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे तर शिवसेना ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजेनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांचे ) महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तगडे आव्हान असणार आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी सत्ताधारी शिवसेना शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे.

नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप, ठाकरे गटाचा आरोप
सुधाकर बडगुजर म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडून नाशिकमध्ये पैसे वाटप सुरु आहे. त्यांच्या पैसे वाटप करणाऱ्या टीमवर आमच्या शिवसैनिकांची करडी नजर आहे. पैसे घेऊन निघाले की आमचे भरारी पथक कामाला लागेल. त्यांच्याकडे माणसं असतील पण पैसे वाटप करणे इतके सोपे नाही. मतदारांपर्यंत पोहोचणे अवघड आहे. प्रत्येक चौकाचौकात आमचे शिवसैनिक तैनात आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन्ही शिवसेना आमनेसामने
दरम्यान, नाशिकमध्ये प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या विजय करंजकरांच्या भगूर गावातून महाविकास आघाडीची प्रचार रॅली जात होती. यावेळी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही शिवसेनेकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना हद्दपारीची नोटीस
ऐन निवडणुकीतच नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना 20 तारखेपर्यंत हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांना नोटीस मिळत असल्याने ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या आधी दाखल असणाऱ्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर नोटीस बजावत असल्याचा उल्लेख नोटीसीत करण्यात आला आहे.

आणखी वाचा

भुजबळांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळ म्हणाले…

हेही वाचा :.

दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर

‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती…’; शरद पवार

राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ