घरच्या घरी करा दही फेशियल, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

दह्याचा वापर केवळ पचनासाठी नाही, तर त्वचेच्या सौंदर्यासाठीही अतिशय उपयुक्त आहे. ऊन, धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर डाग, टॅनिंग आणि कोरडेपणा दिसतो. अशा वेळी महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्सऐवजी घरगुती दही फेशियल नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय ठरतो. फक्त काही घटक वापरून तुम्ही सहज घरच्या घरी हे फेशियल(facial) करू शकता.

दही फेशियलसाठी लागणारे साहित्य :
दही फेशियल करण्यासाठी तुम्हाला ४ साध्या गोष्टींची गरज लागते – दही, मध, हळद आणि लिंबाचा रस. या घटकांमध्ये त्वचा पोषण, दाग दूर करणं आणि ग्लो देण्याचे गुणधर्म आहेत. योग्य प्रमाणात यांचे मिश्रण करून तुम्ही नैसर्गिक फेशियल(facial) तयार करू शकता.

फेशियल करण्यापूर्वी चेहरा सौम्य क्लिंझरने स्वच्छ करा. त्यानंतर एका लहान वाटीत २ चमचे दही, अर्धा चमचा मध, चिमूटभर हळद आणि काही थेंब लिंबाचा रस एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर व मानेला २ ते ३ मिनिटे सौम्य मसाज करत लावा. मग चेहऱ्यावर दह्याचा थर राहू द्या आणि १५–२० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा आणि शेवटी सौम्य मॉइश्चरायझर लावा.

दही फेशियलचे फायदे :
दह्यामुळे चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होतो आणि त्वचेत नॅचरल ग्लो येतो. नियमित वापराने मुरुमांचे डाग कमी होतात आणि त्वचा नितळ व मुलायम बनते.

उन्हाळ्यात टॅन झालेली त्वचा दह्याच्या थंड गुणधर्मामुळे पुन्हा उजळते. दही त्वचेला पोषण देत त्वचाविकारांपासून दूर ठेवते. त्यामुळे हे घरगुती फेशियल कमी खर्चात मोठा सौंदर्य परिणाम देणारे ठरते.

हेही वाचा :

भारताच्या पाकिस्तानवरील हल्ल्याचा शेअर मार्केटवर परिणाम! 

‘पाटील साब है ना’ कोल्हापूरच्या सुपुत्राने काश्मीरमध्ये तीन मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना संपवले

सिद्धार्थ-कियाराच्या अंदाजात आणखी एका कपलने दिली गुडन्यूज, शेअर केला हटले फोटो!