फक्त चालल्याने(walking) खरंच चरबी कमी होते का? मसल्स तयार होतात का? असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये चालणे ही सर्वात जास्त केली जाणारी शारीरिक क्रिया मानली जाते. अनेकजण चालण्याला पसंती देतात, जे आरोग्यासाठी नक्कीच चांगले आहे. पण खरंच चालणं इतकं फायदेशीर आहे का? चालल्याने चरबी कमी होते की मसल्स तयार होतात? चला, याचं उत्तर शोधूया.

चालताना(walking) आपला संपूर्ण शरीरसंचलन (मेटाबोलिझम) सक्रिय होतं. चालण्यासाठी आपले पाय, गुडघे, कंबर, हात, पाठ अशा अनेक स्नायूंचा उपयोग होतो. यामुळे शरीरात ऊर्जा खर्च होते आणि थोड्या प्रमाणात चरबी देखील वितळते. लिमरिक विद्यापीठाच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, चालणं ही शरीराची सर्वसाधारण व्यायाम पद्धत आहे, जी आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. 2014 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, चालल्याने माणसाची क्रिएटिव्ह थिंकिंग वाढते. म्हणजे, चालताना विचार केल्यास माणसाला अधिक चांगले, नाविन्यपूर्ण विचार सुचतात. यामुळे चालणं मेंदूसाठीही फायदेशीर ठरतं.
पण मसल्स तयार होतात का? तर याचं उत्तर आहे फारसं नाही. चालल्यामुळे पायाचे स्नायू (जसं की क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग, काफ मसल्स) थोडे मजबूत होतात, पण मसल्स तयार करण्यासाठी चालणं पुरेसं नाही. त्यासाठी वेट ट्रेनिंग किंवा इंटेन्स वर्कआउट्स आवश्यक असतात. मात्र, ज्यांनी आधी कधीही व्यायाम केला नसेल, त्यांच्यासाठी चालणं ही चांगली सुरुवात ठरू शकते.
चरबीबाबत बोलायचं झालं, तर चालण्यामुळे शरीरात साठलेली चरबी हळूहळू खर्च होते. 2020 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, नियमित चालल्याने शरीराचं वजन आणि फॅट मास दोन्ही कमी होण्यास मदत होते. म्हणून, जर तुम्ही कोणतीही शारीरिक क्रिया करत नसाल, तर आजपासून रोज 30 ते 45 मिनिटं चालायला सुरुवात करा. हे तुमच्या शरीरासाठी, मनासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
हेही वाचा :
शेतकऱ्यांना कर्जमाफी आश्वासन दिले नाही: अजित पवारांनी हात झटकले
आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न, अचानक होणार धनलाभ
राज्यात पुन्हा पावसाचे संकट; विदर्भात आजपासून चार दिवस पावसाचा इशारा