मूड नसेल तर ऑफिसला येऊ नका, कर्मचाऱ्यांसाठी कंपनीची खास ऑफर

मूड नसेल तर ऑफिसला येऊ नका असं जर तुम्हाला तुमच्या बॉसने(company employee) सांगितलं तर. तुमचा निश्चितच यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे अगदी खरं आहे. एका कंपनीनं कर्मचा-यांच्या मूडनुसार त्यांना ऑफिसला येण्याची मुभा दिलीय. पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट

ऑफिसला(company employee) जाण्याची इच्छा नसेल तर अनेकजण तब्येत बिघडल्याचं कारण देऊन सुट्टी घेतात. मात्र ब-याचदा ही थाप पचत नाही. त्यामुळे अशा सुट्टीबहद्दर कर्मचा-यांना बॉसची बोलणी खावी लागतात. मात्र तुमचा कामवर जायचा मूड नसेल आणि तुम्हाला 10 दिवसांची सुट्टी मिळाली तर…होय हे अगदी खरंय. एका कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क लाइफ बॅलेन्स राखण्यासाठी मूडनुसार सुट्टी देऊ केलीय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही कंपनी नेमकी आहे तरी कुठची? तर ही चीनमधली कंपनी आहे.

चायनीज रिटेल टायकून असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीचे मालक यू डोंगलाई यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी या विशेष सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या सुट्ट्या अनहॅपी लिव आहेत ज्या सीएल, पीएल किंवा मेडिकल लिव्हच्या व्यतिरिक्त दिल्या जातील. जर तुम्हाला ऑफिसला येण्याची इच्छा होत नसेल त्यावेळी या सुट्ट्या घेऊन तुम्ही घरीच आराम करू शकता. आता भारतातील कर्मचारीही हाच विचार करत असतील की या चिनी कंपन्यांनुसार आम्हालाही अशा सुट्ट्या कधी मिळतील?

हेही वाचा :

या ७ कारणांमुळे फोन होतो गरम, चुकूनही करु नका या चुका

सभा PM मोदींची अन् फोटो झळकले राहुल गांधींचे; उलटसुलट चर्चांना उधाण

अनुभवच सर्वकाही! शेवटच्या ओव्हरमध्ये रोहितने सूत्र हातात घेतली आणि….; संपूर्ण गेमच पलटला