उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये प्या पुदिन्याच्या पानांचे थंडगार सरबत

उन्हाळा वाढल्यानंतर उष्णतेमुळे अंगाची काहिली होते. घामाच्या धारांमुळे सर्वच नागरिक त्रस्त होऊन जातात. उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. नारळ पाणी, ताक, दही, सरबत इत्यादी थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन आरोग्य सुधारते. याशिवाय तुम्ही पुदिन्याच्या पानांचा सुद्धा रस(Drink) तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिऊ शकता. या पानांमध्ये असलेले गुणधर्म शरीर थंड करतात.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर आतून थंड (Drink)ठेवण्यासाठी रोजच्या आहारात नियमित पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. उन्हाळ्यात सगळ्यात आवडीने प्यायले जाणारे पेय म्हणून पुदिन्याचे सरबत. मात्र बऱ्याचदा पुदिन्याची पाने बाजारत उपलब्ध होत नाही. अशावेळी तुम्ही पुदिन्याच्या पानांची पावडर तयार करून सरबत बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पुदिना सरबत बनवताना लागणारे प्रिमिक्स बनवण्याची सोपी कृती.

साहित्य:

  • पुदिन्याची पाने
  • काळीमिरी
  • बडीशेप
  • साखर
  • वेलची
  • जिरं
  • काळ मीठ
  • सब्जा

कृती:

  • पुदिन्याच्या पानांचे प्रिमिक्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून ताटात पसरवून २ ते ३ दिवस कडक उन्हात सुकवून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याच्या पानांचा चुरा, बडीशेप, काळीमिरी, वेलची, भाजलेले जिरं, खडीसाखर इत्यादी पदार्थ टाकून बारीक वाटून घ्या.
  • पावडर तयार करून झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार त्यात काळ मीठ टाकून मिक्स करा.
  • पुदिन्याचे सरबत बनवताना काचेच्या ग्लासात बर्फाचे खडे टाकून वरून तुमच्या आवडीनुसार त्यात पुदिन्याच्या पानांची पावडर घालून मिक्स करा. याशिवाय तुम्ही त्यात तुम्ही लिंबाचा रस घालू शकता. यामुळे सरबताची चव आणखीनच वाढेल.

हेही वाचा :

धक्कादायक! गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी

असा क्रिकेट प्रेमी होणे नाही! तरुण स्वतःच्याच लग्नात फोनवर बघू लागला IPL मॅच…Video Viral

कपाळाच्या टिकल्या काढल्या अन् ‘अल्ला हू अकबर’ म्हटलं पण..पवारांना सांगितली आपबिती…