मोमोज खाणं बेतू शकतं तुमच्या जीवावर, अत्यंत धक्कादायक माहिती आली हाती

मुंबई : तिबेटमधून आलेला आणि चायनीज फूडच्या नावाखाली गल्लोगल्ली विकला जाणारा पदार्थ म्हणजे मोमोज. तरुणाईमध्ये या मोमोजची(momos) प्रचंड क्रेझ आहे. कमी कालावधीत मोमोजने आपल्या चवीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावले आहे. मात्र, हाच पदार्थ आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू लागला आहे.

व्हेज, नॉनव्हेज, स्टीम, फ्राईड
अशा विविध प्रकारांत मिळणाऱ्या मोमोजचा(momos) भारतात येताना पूर्ण कायापालट झाला आहे. पौष्टिकतेच्या नावाखाली आपण जे मोमोज खातो ते प्रत्यक्षात आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरत आहेत. भारतात बनवले जाणारे मोमोज आरोग्यासाठी घातक का आहेत? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया याची कारणे.
मोमोजमध्ये घातक रसायनांचा वापर-
भारतात मोमोज बनवण्यासाठी वापरला जाणारा मैदा हा रिफाइंड पिठापासून बनवला जातो. या मैद्यामध्ये बेंझॉयल पेरोक्साइड, ॲझोडीकार्बोनमाइड आणि इतर ब्लीचिंग एजंट्सचा वापर केला जातो. या रसायनांचा थेट परिणाम आपल्या स्वादुपिंडावर होतो. यामुळे इन्सुलिनच्या उत्पादनात अडथळा येऊन मधुमेहाचा धोका वाढतो.
मैद्याव्यतिरिक्त मोमोजमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या आणि मांस यांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होते. अनेकदा निकृष्ट दर्जाचे मांस आणि खराब झालेल्या भाज्यांचा वापर केला जातो. काही अहवालांनुसार, चिकन मोमोज बनवण्यासाठी मेलेल्या कोंबड्यांचे मांस वापरले जाते. तसेच, भाज्या न धुताच आणि अर्धवट शिजवलेल्या स्थितीत वापरल्या जातात. यामुळे अपचन आणि अन्नातून विषबाधा होऊ शकते.

मोमोजमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम-
मोमोज बनवण्याची प्रक्रिया देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. मोमोज वाफेवर शिजवले जात असले तरी मैद्यामुळे ते अल्ट्रा प्रोसेस्ड फूड बनते. यामध्ये फायबरचे प्रमाण नगण्य असते. परिणामी, मोमोज पचायला जड जातात आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. सतत मोमोज खाल्ल्याने मूळव्याध होण्याचा धोकाही वाढतो.
मोमोजसोबत दिली जाणारी शेझवान चटणी आणि मेयोनिज देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे. लाल मिरचीपासून बनवलेल्या शेझवान चटणीमध्ये अनेकदा घातक रसायने मिसळली जातात. प्रक्रिया केलेल्या मिरच्यांमुळे पोटाचे विकार आणि अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो. मेयोनिजमध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असल्याने वजन वाढण्याचा धोका असतो. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती विकले जाणारे मोमोज बनवताना स्वच्छतेचा अभाव असतो. तळण्यासाठी वापरले जाणारे तेल आणि उकडण्यासाठी वापरले जाणारे पाणी याचा दर्जाही निकृष्ट असतो. यामुळे हृदयरोग, किडनी आणि यकृताच्या आजारांचा धोका वाढतो.
हेही वाचा :
अरविंद केजरीवालांना जीवे मारण्याचे रचलं जातयं षडयंत्र
गरोदर महिलांना सरकार देणार पैसे; सरकारची ‘जननी सुरक्षा योजना’ काय आहे?
दुसऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाजाला दुखापत, शमीचं कमबॅक होणार?