2029 पर्यंत एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील…

महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाला 2 वर्षांहून अधिक कालावधी उलटून(political news) गेला आहे. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडलं. तेव्हापासून आजपर्यंत पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे.

शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार गट आणि शरद पवार गट(political news) असे दोन गट पडले असून अजित पवार गट 2023 मध्ये मे महिन्यात शिंदे-भाजपा सरकारमध्ये सहभागी झाला. हे तिन्ही पक्ष लोकसभा निवडणूक एकत्र लढवत असून महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट संघर्ष महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. असं असतानाच आता शिंदेंच्या गटातील एका आमदाराने विधानसभा निवडणुकीनंतरही एकनाथ शिंदेंचं राज्याचे मुख्यमंत्री असतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

‘पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच असतील,’ असं शिंदे सरकारमधील राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. भाजपाचे सर्वाधिक आमदार असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याचा उल्लेख करत तानाजी सावंतांनी हे विधान केलं. ते धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारादरम्यान बोलत होते. जाहीर भाषणामध्ये त्यांनी 2029 पर्यंत शिंदेंचं मुख्यमंत्री राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

“देशाचे पंतप्रधान आमचे विश्वनेते नरेंद्रभाऊ मोदी असतील त्यांनी शब्द दिला. आज भाजपाचे 105 आणि अपक्ष मिळून 116 आमदार आहेत. आमचे 40 आणि आमच्याबरोबर असलेले 10 हे खऱ्या अर्थाने शिवसेना आहेत,” असं म्हणत तानाजी सावंत यांनी भाजपाने आम्हाला दिलेला शब्द पाळत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असं म्हटलं. तसेच भविष्यातही शिंदेंच मुख्यमंत्री असतील असा विश्वास व्यक्त केला. “त्यावेळेस भाजपाने जो शब्द दिला तो 100 टक्के पूर्ण केला. आज माझे नेते एकनाथ शिंदे तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसत आहेत. 2024 ते 2029 च्या काळामध्ये तेच महाराष्ट्राचे नेतृत्व करतील,” असं तानाजी सावंत म्हणाले.

तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे गटाचा उल्लेख ‘नकली शिवसेना’ असा करत ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांबद्दल अपशब्दही वापरला. “समोर असलेली नकली शिवसेना आहे. हे सगळेच सांगतात. मी मागाशीही सांगितलं. कडवट शिवसैनिक माझ्याबरोबर आहे आणि $&#$ शिवसैनिक नकली शिवसेनेबरोबर आहे,” असं विधान तानाजी सावंतांनी जाहीर भाषणात केलं. यावरुन नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

सोन्याचे दर गडगडले; दागिन्यांसाठी दुकानात नागरीकांची गर्दी

‘उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये’, पवारांचं सूचक विधान

ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात