लोकसभा निकालपूर्वीच स्वस्त झाले सोने-चांदी, भाव तरी काय

लोकसभा निवडणूक 2024 कोण जिंकणार, जनतेचा कौल(gold) कुणाला हे अवघ्या काही तासात समोर येईल. पण व्यापारी जगतातून एक मोठी खबरबात समोर येत आहे. सोने आणि चांदीत गेल्या आठवड्याच्या अखेरपासून सुरु असलेली घसरण अजूनही थांबलेली नाही. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने स्वस्त झाले. तर चांदीचा तोरा उतरला. चांदी दणकावून आपटली. चांदी या पाच दिवसांत 5 हजार रुपयांनी आपटली आहे. तर सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. मौल्यवान धातूच्या अशा आहेत किंमती

गेल्या गुरुवारपासून सोन्याने दरवाढीला(gold) ब्रेक दिला आहे. 30 मे रोजी 440 रुपयांची तर 1 जून रोजी त्यात 210 रुपयांची घसरण झाली. 31 मे रोजी भाव स्थिर होता. त्यापूर्वी सोन्यामध्ये 750 रुपयांची दरवाढ झाली होती. 1 जून रोजी सोने 210 रुपयांनी स्वस्त झाले. तर 3 मे रोजी किंमती 440 रुपयांनी उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने 6 हजारांची भरारी घेतली होती. त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली. गेल्या पाच दिवसांत चांदीत 5 हजारांची घसरण झाली. 30 मे रोजी चांदी 1200 रुपये, 31 मे रोजी 1000 रुपये, 1 जून रोजी 2,000 रुपये तर 3 जून रोजी 700 रुपयांनी किंमती घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,800 रुपये आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले तर चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 71,776 रुपये, 23 कॅरेट 71,489 रुपये, 22 कॅरेट सोने 65,747 रुपये झाले. 18 कॅरेट 53,832 रुपये, 14 कॅरेट सोने 41,989 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 90,217 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता

हेही वाचा :

कोल्हापूरमध्ये कारने चौघांना चेंडूसारखं हवेत उडवलं! 3 ठार Video

6 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरूंची

लोकसभेच्या सलग तिसऱ्या निवडणुकीत कोल्हापुरात ‘सतेज’ करिश्मा