लोकप्रिय ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर आज 12 जुलै रोजी GOAT सेल सुरु होणार आहे. Flipkart Goat Sale 2025 हा आज 12 जुलै रोजी सुरु होणार असून त्याची शेवटची तारीख 17 जुलै आहे. फ्लिपकार्टचा हा सेल सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. म्हणजेच सर्व ग्राहकांना या सेलमध्ये ऑफर्स(offers)आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Flipkart Goat Sale 2025 मध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्स, वायरलेस एसेसरीज, टॅबलेट, लॅपटॉप आणि अनेक इलेक्ट्रॉनिक सामानावर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे.
Flipkart Goat Sale 2025 मध्ये ग्राहकांना पावर बँक, स्मार्ट गॅजेट्स आणि कॅमेऱ्याच्या खरेदीवर मोठी सूट मिळणार आहे. लॅपटॉप ब्रँड्समध्ये तुम्ही HP, Lenovo, Dell आणि Asus सारख्या ब्रँड्सचे लॅपटॉप कमी किंमतीत खरेदी करू शकता. तर पावर बँक आणि स्मार्ट गॅजेट्समध्ये boAt, Noise आणि Zebronics च्या प्रोडक्ट्सचा देखील समावेश आहे. कॅमेरा आणि अॅक्सेसरीजसाठी तुम्ही Canon, Nikon आणि Sony सारख्या ब्रँड्सचा विचार करू शकता.
या सर्व प्रोडक्ट्सवर तुम्हाला सेलमध्ये 40 ते 70 टक्के डिस्काऊंट दिलं जाणार आहे. याशिवाय काही प्रिमियम ब्रँड्स जसे की, Nothing आणि Motorola च्या लेटेस्ट प्रोडक्ट्सवर देखील तुम्हाला मोठं डिस्काऊंट ऑफर(offers) केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे सर्व डिव्हाईस कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Flipkart GOAT Sale 2025 मध्ये ग्राहकांसाठी अनेक धमाकेदार आणि जबरदस्त डिल्स उपलब्ध असणार आहेत. मात्र काही प्रिमियम ऑफर्सबद्दल बोलायचं झालं तर या सेलमध्ये ग्राहकांना iPhone 16 च्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. खरं तर iPhone 16 79,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता.
मात्र आता हा फोन Flipkart GOAT Sale 2025 मध्ये 59,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर फोनची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे तुम्हाला आयफोन खरेदी करण्याची एक चांग ली संधी मिळणार आहे. अनेकांचा आयफोन खरेदी करण्याचं स्वप्न आता अखेर पूर्ण होणार आहे.
याशिवाय Flipkart GOAT Sale 2025 मध्ये ग्राहकांना सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन Galaxy S24 देखील ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ऑफर्स (offers)आणि डिस्काऊंटमुळे या फोनची किंमत अत्यंत कमी झाली आहे. हा फोन 52,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र सेलमध्ये हा स्मार्टफोन 46,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय 27,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला मोटोरोला Edge 60 Pro आता सेलमध्ये 27,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
फ्लिपकार्ट गोट सेलमध्ये होम यूटिलिटी प्रोडक्ट्सवर देखील जबरदस्त डिस्काऊंट दिलं जाणार आहे, या श्रेणीमध्ये, तुम्ही घरगुती स्वच्छतेच्या वस्तू, स्वयंपाकघरातील वस्तू आणि दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त दरात खरेदी करू शकता. यामध्ये क्लीनिंग ब्रशेस, क्लीनिंग टूल्स, स्टोरेज बॉक्स आणि संस्थेशी संबंधित वस्तूंचा समावेश आहे. या सर्वांवर 85% पर्यंत सूट दिली जात आहे. जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अमेझॉन प्राइम आणि फ्लिपकार्ट गोट सेल तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.
हेही वाचा :