एका विकृत तरूणाने ब्रेकअपनंतर आपल्या(private) एक्स गर्लफ्रेंडचे काही नग्न अवस्थेतील व्हिडिओ शूट करून व्हायरल केले आहेत. ही धक्कादायक घटना अहमदाबाद येथील बोडकदेव परिसरात घडली आहे. ही माहिती मंगळवारी उघडकीस आल्यानंतर पीडित महिलेने आपल्या एक्स बॉयफ्रेंडविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला (private) आणि आरोपी गेल्या २ वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. २ महिन्यांपूर्वी त्यांनी ब्रेकअप केलं. नंतर आरोपीने तरूणीकडे काही पैसे मागितले. तरूणीनं नकार देताच आरोपी धमकी देऊ लागला. तसेच आरोपीने तरूणीला तिचे प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
इतकंच नाहीतर त्याने व्हिडिओ देखील व्हायरल केले. पीडित तरूणीला सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती तिच्या मैत्रिणीकडून मिळाली. त्यानंतर तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. एक्स बॉयफ्रेंडकडून झालेला छळ आणि त्याने व्हायरल केलेले व्हिडिओ ही सगळी माहिती तरूणीने पोलिसांनी दिली.
पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीविरोधात (private) आयटी अॅक्ट आणि संबंधित लैंगिक छळाविरोधी कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. संबंधित व्हिडिओ हटवण्याचीही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर विनयभंगप्रकरणी शिक्षकास सक्तमजुरी घरात बोलावून मुलीशी अश्लील चाळे
महिलेने 14 वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट दातांनी चावला आणि मग जे घडले ते भयंकरच
उष्णतेच्या झळा अन् गारपिटीचं संकट एकाचवेळी! हवामान खात्याचा 9 जिल्ह्यांना इशारा