आधी एक्स बॉयफ्रेंडनं गिफ्ट दिलं, नंतर नवरदेवावर चाकूने हल्ला केला Video

सध्या सोशल मीडियावर राजस्थानमधील लग्नाचा एक व्हिडीओ(Video) खूप वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वधूचा जुना प्रियकर तिच्या लग्नात पोहोचला आणि नंतर त्याने घातलेला गोंधळ त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. एक्स बॉयफ्रेंड इतक्यावरच थांबला नाही, त्याने नवऱ्यावर चाकूने हल्ला केला. यामुळे उपस्थितांमध्ये आणि सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

तुमचा एक्स बॉयफ्रेंड जर लग्नात आला तर आनंद होईल की भीती वाटेल? प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं असं म्हटलं जातं. पण काही जण या म्हणीला फारच गांभीर्यानं घेतात. अन् प्रेम मिळवण्यासाठी टोकाचं पाऊल उचलतात. राजस्थानमधील भिलवाडा येथील असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. एक्स बॉयफ्रेंड लग्नात आला, त्यानं नवरीला शुभेच्छाही दिल्या. फोटो काढला, त्यानंतर त्यानं नवरदेवावर चाकूने सपासप वार केले. नवरदेवाच्या डोक्यावर पगडी असल्यामुळे मोठी दुखापत झाली नाही. पण या घटनेच्या व्हिडीओने(Video) सोशल मीडियाचं वातावरण तापलेय. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद घेतली आहे.

नवरीचा भाऊ विशाल याने या हल्ल्याबाबत पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘चाकूने हल्ला कऱणाऱ्या आरोपीचं नाव शंकर लाल भारती असे आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.’

नवरीचा भाऊ विशाल म्हणाला की, दोन दिवसांपूर्वी बहिणीचं लग्न भिलवाडा येथे महेंद्र सेन याच्यासोबत होत होतं. लग्न झाल्यानंतर नवरा-नवरी स्टेजवर बसले होते. त्याचवेळी शंकरलाल याने शुभेच्छा दिल्या, अन् अचानक नवरदेवावर हल्ला केला. या प्रसंगामुळे एका क्षणात आनंदाच वातावरण दुख:त बदललं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

आरोपी शंकरलाल याच्यासोबत लग्नात आलेल्या मित्रांनीही गोंधळ घातला. तोडफोड केली. नवरी भीलवाडा येथे सरकारी शाळेत शिक्षक आहे. आरोपी शंकरलाल दोन वर्षांपूर्वी याच शाळेत शिक्षक होता. त्यानंतर त्याची बदली झाली. दोन वर्षांमध्ये शंकरालाल याचं सूत जुळलं होतं. पण ब्रेकअपनंतर मुलीचं लग्न इतर मुलाबरोबर झालं. ही गोष्ट शंकरलाल याला रुचली नाही, त्यानंतर लग्नात जाऊन त्याने राडा घातला. शंकरलाल याने नवऱ्यावर चाकूने हल्ला केला.

हेही वाचा :.

 Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट

‘रावण पण हिंदुत्ववादी’, मतदानाच्या दिवशी राज ठाकरेंवर खूप बोचरी टीका

मोठी बातमी! EVM मशिनला हार घातला, नावाच्या चिठ्ठ्या वाटल्या; शांतीगिरी महाराजांसह ४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल