आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा एकेकाळचा (player)सदस्य असलेल्या शिवालिक शर्मा या क्रिकेटपटूला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका तरुणीने त्याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जोधपूर पोलिसांनी त्याला गुजरातमधील वडोदरा येथून ताब्यात घेतले.पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्माने तिच्याशी लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी जोधपूरच्या कुडी भगतसुनी पोलीस ठाण्यात शिवालिकविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून शिवालिक फरार होता.

पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असून, दंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील पुरावे गोळा करून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. शिवालिक शर्माचा शोध घेत असलेल्या पोलिसांना अखेर सोमवार, ५ मे रोजी यश आले आणि त्याला वडोदरा येथून अटक करण्यात आली.(player)जोधपूर आयुक्तालयाचे एसीपी आनंद सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडी भगतसुनी येथील सेक्टर २ मध्ये राहणाऱ्या पीडित तरुणीने हा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिची आणि शिवालिकची ओळख फेब्रुवारी २०२३ मध्ये वडोदरा येथे झाली होती. त्यानंतर त्यांच्यात फोनवरून संभाषण वाढले आणि जवळीक निर्माण झाली.
ऑगस्ट २०२३ मध्ये शिवालिकचे आई-वडील जोधपूरला आले आणि दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांचा साखरपुडा पार पडला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, साखरपुड्यानंतर शिवालिक जोधपूरला परत आला, तेव्हा त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ते दोघे राजस्थानातील अनेक ठिकाणी फिरायला गेले, त्यावेळीही त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.मात्र, (player)ऑगस्ट २०२४ मध्ये पीडितेला वडोदरा येथे बोलावण्यात आले असता, शिवालिकच्या पालकांनी तो एक क्रिकेटपटू असून त्याला इतर ठिकाणांहूनही लग्नाची स्थळे येत असल्याचे सांगत हा साखरपुडा मोडण्यास सांगितले. यानंतर पीडितेने पोलिसात धाव घेतली. वडोदराचा रहिवासी असलेला शिवालिक शर्मा २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता आणि तो अष्टपैलू खेळाडू म्हणून वडोदराकडून रणजी ट्रॉफीही खेळला आहे.
हेही वाचा :
घराबाहेर मुले खेळत होती, तेवढ्यात बिबट्या धावत आला अन्…Video Viral
महाराष्ट्रात आजही वादळी-वाऱ्यासह पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी दक्षतेचा इशारा