सातवीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक (captive)घटना मध्य प्रदेशमध्ये घडली. मध्य प्रदेशच्या मांडला जिल्ह्यात ही घटना घडली. सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलीचे अपरहण करून तिला ३ दिवस डांबून ठेवत दोघांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे मध्य प्रदेश हादरले आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जबलपूरमध्ये राहणारी आहे. तिची ६ महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एका तरुणाशी ओळख झाली. मांडला येथे राहणारा राजन नावाच्या तरुणासोबत तिची मैत्री झाली. दोघांनी एकमेकांना आपले मोबाइल नंबर शेअर केले. (captive)त्यानंतर तासंतास त्यांचे फोनवर बोलणं सुरू झाले. राजनने पीडित मुलीला विश्वास घेत तिला भेटण्यासाठी मांडला येथे बोलावले. ‘तुला कान्हा व्याघ्र प्रकल्प दाखवतो.’, असे त्याने तिला सांगितले.
राजनवर विश्वास ठेवत पीडित मुलगी २६ एप्रिल रोजी १०० किलोमीटर दूर असलेल्या मांडाला येथे एकटी गेली. त्याठिकाणी राजन तिला भेटला. त्याने तिला कान्हा व्याघ्र प्रकल्प दाखवतो सांगून मित्राच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी राजनचा मित्र आधीच उपस्थित होता. या दोघांनी पीडित मुलीला डांबून ठेवले. सलग ३ दिवस त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. जर याची माहिती कोणाला सांगितली तर तुला जीवे मारू अशी धमकी आरोपींनी तिला दिली.
३ दिवसांनंतर आरोपींनी बुधवारी पीडित मुलीला मांडला (captive)बस स्टँडवर सोडून देत पळ काढला. तसंच तिला इशारा देखील दिला की, ‘याची माहिती कोणाला सांगितली तर तुला सोडणार नाही आणि परिणाम गंभीर होतील.’ घाबरलेली पीडित मुलगी कशी तरी जबलपूरमधील आपल्या घरी पोहचली आणि तिने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर धक्का बसलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना तिला घेऊन पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा :
पंतप्रधान नट-नट्यांसोबत व्यस्थ अन्…; खासदार संजय राऊतांचा घणाघात
4 संकेतावरुन ओळखा जोडीदाराचं तुमच्यासोबतचं नातं मनातून तुटलंय
…अन् मॅचनंतर त्याने थेट पॉन्टिंगच्या बायकोलाच मारली मिठी! भारतीय क्रिकेटरचा Video चर्चेत