3 जूनपासून ‘या’ राशींचं नशीब पालटणार; कमावणार बक्कळ पैसा

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह हा त्याच्या निश्चित वेळेत संक्रमण(astrology) करतो. या ग्रहांच्या राशी बदलाचा आणि ग्रहांच्या स्थितीचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होत असतो.

आता काही दिवसांत आणखी एक ग्रहाचं मोठं मार्गक्रमण(astrology) होणार आहे. ज्योतिषशास्त्रात, गुरु (Jupiter) ग्रहाचं संक्रमण म्हणजे सर्वात मोठी घटना मानली जाते. 3 जून रोजी दुपारी 3:21 वाजता गुरु वृषभ राशीत उदयास येईल. याचा काही राशींना फायदा होईल, या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

वृषभ रास
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीमध्ये गुरुचा उदय काही राशींसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. वृषभ राशीत गुरुचा उदय होणार आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळेल. यावेळी काही खास योजना बनवणं आणि महत्त्वाची काम करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि ती कामं देखील नक्कीच पूर्ण होतील. यासोबतच तुम्हाला चांगला फायदा होईल. यावेळी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचं उत्पन्नही वाढेल. या काळात नोकरदार लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे स्रोत वाढतील, तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. या काळात तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. पती-पत्नीमध्ये प्रेम खूप वाढेल.

कर्क रास
ज्योतिष शास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचा उदय खूप शुभ आणि फलदायी मानला जातो. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यावेळी तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील, यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तुमची सर्व कामं वेळेवर पूर्ण करू शकाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना या काळात यश मिळेल. परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वप्नं पूर्ण होतील.

सिंह रास
ज्योतिष शास्त्रानुसार, सिंह राशीच्या व्यावसायिकांसाठी गुरूचा उदय फायदेशीर ठरेल. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी शुभ परिणाम मिळतील. यावेळी सिंह राशीच्या लोकांच्या पगारात वाढ होईल. यावेळी तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकतं. त्याच वेळी, जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला लवकरच चांगली नोकरी मिळू शकते. गुरु उदयाच्या प्रभावामुळे बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकाल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

हेही वाचा :

आता कमी होणार ‘स्पॅम कॉल’ चा त्रास…

14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला डेट करतेय शिवांगी? अखेर सोडलं मौन

विराट कोहली पुढच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार