टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्याच सामन्यात कॅप्टन Rohit Sharma जखमी

टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने(team india) विजयाने सुरुवात केली आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडचा संघ 16 षटकांत सर्वबाद 96 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 12.2 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले.

भारताकडून कर्णधार रोहित शर्माने(team india) 52 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने 3 गडी बाद केले. पहिला विजय मिळवून टीम इंडियाने 2 गुण खात्यात जमा केले आहेत. पण टीम इंडियासाठी गड आला खरा पण सिंह मात्र जायबंदी झालाय. होय, रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात दुखापग्रस्त झालाय.

झालं असं की, रोहित शर्माने आयर्लंडविरुद्ध खेळताना 36 चेंडूत आपल्या टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 30 वं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, ओव्हर संपताच तो फिजिओसोबत मैदानाबाहेर गेला. आधीच्या ओव्हरमध्ये एक बॉल रोहितच्या उजव्या हातावर बसला. त्यामुळे त्याला फिजिओची मदत घ्यावी लागली. मात्र, मैदानात उपचार केल्यानंतर देखील रोहित शर्माने मैदान सोडलं. त्यामुळे सर्वांनाच धडकी भरली. रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर सूर्यकुमार मैदानात आला होता.

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम नावावर केला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. आयर्लंडविरुद्ध 26 धावा करत रोहितने विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहली आणि बाबर आझमनंतर ही कामगिरी करणारा तिसरा खेळाडू आहे. रोहित शर्माने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत 40 सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण 988 धावा केल्या आहेत.

हेही वाचा :

भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यावर पावसाचे सावट…

महाराष्ट्राने भाकरी फिरवली! मविआचा महायुतीवर मोठा विजय

मोठी बातमी! चिमुकल्यांची किलबिल कानी पडणार, १५ जूनला शाळेची घंटा वाजणार