भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार MS धोनीच्या कर्णधारपदावर पुन्हा बोलला गंभीर

सध्या भारतात आयपीएल 2024 चा धमाका सुरू आहे. ज्यामध्ये आज 22 वा सामना आज (successful)कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे.सध्या भारतात आयपीएल 2024 चा धमाका सुरू आहे. ज्यामध्ये आज 22 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. पण या सामन्याआधी केकेआरचा मार्गदर्शक गौतम गंभीरने महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे. त्याने सांगितले की धोनी हा जगातील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 वर्ल्ड कप 2007, एकदिवसीय वर्ल्ड कप 2011 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 जिंकली आहे. जगातील यशस्वी कर्णधारांमध्ये धोनीच्या नावाचा समावेश होतो. तो सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे.

या हंगामाच्या सुरुवातीला त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. (successful)आता त्यांच्या जागी ऋतुराज गायकवाड संघाचे नेतृत्व करत आहेत. धोनीने आयपीएलमध्ये 226 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून त्याच्या संघाने 133 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

कोलकाता विरुद्ध चेन्नई सामन्यापूर्वी गौतम गंभीर म्हणाला की, एमएस हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, मला वाटत नाही की कोणीही त्यापर्यंत जाईल. त्याने भारताला तीन वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकून दिली आहे.

गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने दोनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहेत. यासोबत कोलकाता आयपीएलच्या 17 व्या हंगामात संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे. आज चेन्नईविरुद्धच्या विजयाकडे संघाची नजर असेल.

गंभीर पुढे म्हणाला, “तो रणनीतीच्या बाबतीत खूप चांगला आहे. त्याला स्पिनर्सवर (successful)नियंत्रण कसे ठेवायचे, कोणाविरुद्ध क्षेत्ररक्षण कसे करायचे हे त्याला माहीत होते आणि त्याने कधीही हार मानली नाही. तो 6 किंवा 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करायचा.. आणि तो जोपर्यंत होता तोपर्यंत आम्हाला माहित होते की तो खेळ पूर्ण करू शकतो

हेही वाचा :

हे खेळाडूही सोडणार MI ची साथ रोहित शर्मानंतर टीमला बसणार मोठा धक्का

काँग्रेसची फजिती! राहुल गांधींच्या सभेच्या होर्डिंगवर मोदी सरकारमधील मंत्र्यांचा फोटो

पोरींचा राडा… भररस्त्यात तुफान हाणामारी; घटनेचा व्हिडिओ व्हायरल