सध्या आयटीआर भरण्यास सुरुवात झाली आहे. अनेक करदाते इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी(income tax) वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात किंवा कॅशमध्ये व्यव्हार करतात. परंतु जर तुम्ही तुमच्या पत्नीला कॅशमध्ये पैसे देत असाल किंवा बँक ट्रान्सफर करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी.
इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार, हे पैसे तुमच्या उत्पन्नात मोजले जाते. आणि यामुळे तुम्हाला टॅक्स नोटीस येऊ शकते. यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
तुम्हाला इन्कम टॅक्सचे काही नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहेत. जरी तुम्ही तुमच्या(income tax) बायकोला कॅशमध्ये पैसे देत असाल तरीही तुम्हाला नोटीस येऊ शकते.
क्लबिंग ऑफ इन्कम नियम
आयकर नियमाअंतर्गत कलम 269SS और 269T चे पालन करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या पत्नीला घरखर्चासाठी किंवा गिफ्ट म्हणून रोख पैसे देतात. त्यावर टॅक्स लागणार नाहीये. ही रक्कम पतीच्या उत्पन्नात ग्राह्य धरली जाते. मात्र जर तुमची बायको हे पैसे वापरुन गुंतवणूक खरेदी करत असाल तर हे उत्पन्नात मानले जाते.यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. ही रक्कम क्लबिंग ऑफ इन्कम नियमाअंतर्गत तुमच्या उत्पन्नात जोडली जाते.
कलम 269SS आणि 269T अंतर्गत रोख रक्कमेचे व्यव्हार रेग्युलेट केले आहेत जेणेकरुन (income tax)काळा पैशांवर आळा घातला जाईल.कलम 269SS अंतर्गत कर्ज, ठेव किंवा आगाऊ रक्कम २०,००० पेक्षा जास्त स्विकारण्यास मनाई आहे. जर पतीने पत्नीला २०००० रुपये दिले तर ति बॅकिंगद्वारे म्हणजे चेक, एनईएफटी, आरटीजीएसद्वारे केली पाहिजे. कलम 269T अंतर्गत जर २०,००० पेक्षा जास्त कर्ज परत करायचे असेल तर तेदेखील बँकेद्वारे करायला हवे. पती-पत्नीसाठी या कलमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड नाही परंतु पारदर्शकता महत्त्वाची आहे.
हेही वाचा :