अक्षय्य तृतीयेआधी सोनं झालं स्वस्त…

अक्षय्य तृतीया काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, सोन्याच्या(Gold) दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून लाखाच्या पुढे गेलेले सोने आता ९९ हजाराच्या खाली घसरले आहे. परिणामी, सराफ बाजारात खरेदीसाठी गजबजाट होण्याची शक्यता आहे. अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्याला विशेष महत्त्व असल्याने ही वेळ ग्राहकांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

सध्या २४ कॅरेट सोन्याचा(Gold) दर ९७,१८३ रुपये प्रति तोळा इतका आहे. गेल्या काही दिवसांत सोनं १५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे लग्नसराईत किंवा अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. सराफ व्यावसायिकांनाही बाजारात खरेदी वाढण्याची आशा आहे.

२८ एप्रिल रोजीच्या दरानुसार, रिटेल मार्केटमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ९७,१८३ रुपये प्रति तोळा, २२ कॅरेटचा दर ८९,३४५ रुपये प्रति तोळा तर १८ कॅरेट सोनं ७३,१०० रुपये प्रति तोळा आहे. आरटीजीएस सोन्याचे दरही १४१० रुपयांनी कमी झाले असून, २४ कॅरेट आरटीजीएस सोनं ९५,४४० रुपये प्रति तोळ्याला मिळत आहे.

तसेच, जीएसटीसह सोन्याचे दर १४६४ रुपयांनी स्वस्त झाले असून, २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,३५४ रुपये प्रति तोळा आहे. २२ कॅरेट सोनं जीएसटीसह ९०,१३९ रुपये प्रति तोळा या दराने उपलब्ध आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी सध्या अतिशय योग्य वेळ आहे.

सोन्याच्या किंमतींमध्ये भविष्यात आणखी घसरण होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कझाकिस्तानच्या सॉलिडकोर रिसोर्सेज पीएलसी या सोन्याच्या खाण कंपनीच्या सीईओंनी सांगितले की, पुढील १२ महिन्यांत सोन्याचा आंतरराष्ट्रीय दर २५०० डॉलर्सपर्यंत घसरू शकतो. मात्र, ते १८०० ते १९०० डॉलर्सच्या पातळीवर परत येण्याची शक्यता फारशी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर, सध्या कमी दरात सोनं खरेदी करणं शहाणपणाचं ठरेल, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोनं विकत घेण्याची परंपरा लक्षात घेता, या घटलेल्या दरांचा फायदा घेण्यासाठी नागरिकांमध्ये खरेदीची चढाओढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

१ मेपासून बदलणार महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

इचलकरंजीत ‘गाव चलो, वस्ती चलो’ अभियानात नागरिकांशी थेट संवाद; प्रकाश अण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली उत्स्फूर्त प्रतिसाद

वयात आलेल्या मुलीसोबत ‘या’ 5 गोष्टी कधीच शेअर करु नका; खोलवर होतो परिणाम