सोन्याचे दर गडगडले, चांदीचे भाव स्थिर! ग्राहकांची खरेदासाठी मोठी गर्दी

भारतात 14 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याची(gold) किंमत 7,044 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,684 रुपये प्रति ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,440 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,840 रुपये झाला आहे.

तर 18 कॅरेट सोन्याच्या(gold) प्रति 10 ग्रॅमचा दर 57,630 रुपये आहे. 13 नोव्हेंबर रोजी भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,084 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,728 रुपये प्रति ग्रॅम होती. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,840 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,280 रुपये होता.

भारतात आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिवाळी संपली आणि तुळशीचे लग्न देखील पार पडले. आता लग्नसराई आणि साखरपुड्याचे मुहूर्त सुरु होतील. त्यामुळे लग्नसराईसाठी सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी लगबग सुरु आहे. अशातच आता सतत सोन्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याच्या(Gold) प्रति 10 ग्रॅमचा दर 70,440 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,840 रुपये झाला आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 57,630 रुपये झाला आहे. भारतात आज चांदीची किंमत 90.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 90,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. मुंबईत आज चांदीची किंमत 90.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 90,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. त्यामुळे आज देशात चांदीचे दर स्थिर आहेत. मात्र सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,490 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,890 रुपये झाला आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 57,670 रुपये झाला आहे. दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,590 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,990 रुपये झाला आहे.

तसेच 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 57,760 रुपये झाला आहे. 13 नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,990 रुपये होता. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,430 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,080 रुपये होता.

सुरतमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,490 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,890 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 57,670 रुपये झाला आहे. तर 13 नोव्हेंबर रोजी सुरतमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,890 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,330 रुपये होता. 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,000 रुपये होता.

हेही वाचा :

आजअनेक शुभ योग; 4 राशींना होणार डबल लाभ, पाण्यासारखा पैसा कमवणार

सरकारी नोकरी पगार 92 हजार; ITBP मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी

“स्वतःला मर्द समजणाऱ्या ठाकरेंच्या बॅगमध्ये लिपस्टिक-लाली..”; नितेश राणेंची खोचक टीका