सोन्याच्या घसरणीला अखेर ब्रेक, दर पुन्हा वाढले; जाणून घ्या आजची किंमत
देशात अनेक ठिकाणी लग्नाचा सिझन सुरु आहे. यावेळी वर असो (gold price)किंवा वधू प्रत्येकाच्या कुटुंबाचं लक्ष हे सोन्याच्या भावांकडे असतं. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोन्याचा भाव घसरत होता. मात्र आज म्हणजेच २८ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आजच्या दिवशी काय आहे सोन्याचा भाव पाहूयात.मनी कंट्रोलच्या वेबसाईटनुसार, गुरुवारी 28 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम सोनं महागलंय. दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोन्याच्या दरात 300 रुपयांनी वाढ झालीये. 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,200 रुपयांपर्यंत आहे. तर दुसरीकडे 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,600 रुपये आहे.
आज देशात चांदीचा भाव कसा?
देशात आज चांदीच्या भावामध्ये ना घट झालीये ना वाढ झालीये. देशात एक किलो चांदीची किंमत फक्त 89,500 रुपये आहे. चांदीच्या आजच्या दिवशी कोणताही (gold price)बदल झालेला नाही.
देशात का महाग झालं सोनं?
सलग दोन दिवस घसरणीनंतर आज सोन्याच्या भावात वाढ झाल्याची माहिती आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात 1300 रुपयांनी घट झालीये. तज्ज्ञांट्या म्हणण्यानुसार,(gold price) सोन्याचा व्यापार एका श्रेणीत होतो. किंचीत वाढ झाल्यावर त्यामध्ये घटही होते. 2025 मध्ये सोन्याच्या किमती चांगला परतावा देतील असं तज्ज्ञांचं मत आहे.
विविध शहरांतील १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेऊ
मुंबई
22 कॅरेट सोनं – 71,050 रुपये
24 कॅरेट सोनं – 77,510 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 71,050 रुपये
24 कॅरेट सोनं – 77,510 रुपये
लखनऊ
22 कॅरेट सोनं – 71,200 रुपये
24 कॅरेट सोनं – 77,510 रुपये
जयपूर
22 कॅरेट सोनं – 71,200 रुपये
24 कॅरेट सोनं – 77,660 रुपये
नवी दिल्ली
22 कॅरेट सोनं – 71,200 रुपये
24 कॅरेट सोनं – 77,660 रुपये
हेही वाचा :
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी! कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी
आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; 5 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा
डॉक्टरांनी सुचवलेली 7 जादुई फळं फक्त 20 रुपयांत हाडांना बनवा लोखंडासारखी मजबूत
महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम जनतेच्या मतांनीच भाजप प्रदेशाध्यक्ष यांचे विधान
विधानसभेत सात आमदार निवडून येताच जैन समाजात उत्साहाचा माहोल