दररोज वाढत असणाऱ्या महागाईत सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील इतिहासात प्रथमच वीजदरात(electricity ) कपात केली जाणार आहे. पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्यात येणार असल्याची देखील माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

राज्यातील वीज(electricity ) ग्राहकांसाठी वीजदर ठरवण्यासाठी महावितरणाने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) निर्णय दिला आहे. एमईआरसीने घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या(electricity ) याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील.

आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे. असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा :
- दोन बायका असल्या म्हणून काय झालं? यासाठी आमदाराकी…; कोर्टाचा BJP आमदाराला दिलासा
- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची अपडेट
- महाराष्ट्राची शान ‘कोल्हापुरी चप्पल’ आता Prada च्या नव्या कलेक्शनमध्ये, $1000 ला विकली जाणार चप्पल;
- 30 वर्षीय पत्नीचे 55 वर्षीय प्रियकराशी अनैतिक संबंध, नवऱ्याने रंगेहाथ पकडून दोघांना संपवलं