लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दहावा हफ्ता आता…

पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण(sisters)’ योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फायदाही झाल्याचे दिसून आले आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत नऊ हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात पडले असून, दहाव्या हफ्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागली आहे.

निवडणुकीपूर्वी 1500 रुपये प्रति महिना दिल्यानंतर आता 2100 रुपये देऊ असे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप याबाबत हालचाली झालेल्या नाहीत. त्यातच सरकारमधील नेते नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लाडक्या बहिणींना(sisters) 2100 रुपये देऊ असे कुणीही म्हटलेच नसल्याचे झिरवाळ यांनी नुकतेच म्हटले होते. दरम्यान, अक्षय्य तृतीयेला म्हणजेच 30 एप्रिल रोजी दहावा हफ्ता खात्यात पडणार असल्याचे बोलले जात आहे.

जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर मार्चचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळाला होता. तर आता एप्रिलचा हप्ता अक्षय्य तृतीयेला मिळणार आहे. दरम्यान, शासनाकडून योजनेचे निकष कडक पद्धतीने राबविले जात असल्याने लाभार्थी संख्येत आणखी घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

प्रत्येक जिह्यात महिला व बालविकास विभागाकडून अर्जाची पुनर्तपासणी केली जात आहे. आतापर्यंत राज्यात 11 लाख लाडक्या बहिणी यासाठी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. महिलांची नावे वगळण्यात येत असल्याने दर महिन्यात यातील लाभार्थी आकडे बदलत आहेत. तर संभाजीनगर जिल्ह्यात ९ लाख ३२ हजार २५० महिला या योजनेसाठी सध्या लाभ घेत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी सरकारने ही रक्कम १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अर्थसंकल्पात याबाबत कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही रक्कम वाढविण्यात येईल, असे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. यासाठी लाभार्थी महिलांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

शासकीय योजनांचा आर्थिक लाभ मिळवणाऱ्या महिलांना ५०० रुपये देण्याबाबतही कार्यवाही सुरु झाली आहे. ज्या महिलांना शेतकरी सन्मान योजनेंतर्गत वर्षाला 12 हजार मिळतात, त्यांना आता लाडकी बहीण(sisters) योजनेत 500 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

हेही वाचा :

पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, “४ आणि ५ मे रोजी…”

विराट कोहली आणि अनुष्का शर्माला लंडनला का शिफ्ट व्हायचंय? खरं कारण आलं समोर

शरद पवारांना मोठा झटका, दोन माजी मंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर