Google Chrome वापरकर्त्यांनो, सावधान! सरकारने दिला गंभीर इशारा

हल्ली गुगल क्रोमचा(Chrome) वापर करणं अगदी सामान्य झालं आहे. खरं तर आपलं प्रत्येक काम गुगल क्रोमवर अवलंबून असतं. काही अडलं, एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नाही, कोणत्याही विषयावरील माहिती शोधायची असेल आपल्याला आपल्या प्रत्येक कामात गुगल क्रोम मदत करते. तुम्ही देखील लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मॅकबुकवर गुगल क्रोम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारने गुगल क्रोम युजर्ससाठी एक अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये युजर्सचा पर्सनल डेटा चोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तुम्ही देखील लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मॅकबुकवर गुगल क्रोमचा(Chrome) वापर करत असाल तर तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. सरकारने गुगल क्रोमबाबत एक अलर्ट जारी केला आहे. खरं तर सरकारने गुगल क्रोम ब्राउझरच्या दोन त्रुटींबद्दल इशारा दिला आहे, ज्यामुळे युजर्सची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते.
सरकारच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ने म्हटले आहे की, गुगल क्रोम ब्राउझरमध्ये आढळलेल्या या त्रुटींमुळे हॅकर्स सिस्टममध्ये प्रवेश करू शकतात, ज्यामुळे युजर्सचा डेटा चोरी होऊ शकतो. त्यामुळे युजर्सनी काळजी घेणं फार गरजेचं आहे. यासोबतच CERT-In ने यापासून सुरक्षित राहण्याचे मार्गही सांगितले आहेत.
CERT-In ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या गुगल क्रोममध्ये CIVN-2025-0007 आणि CIVN-2025-0008 नावाच्या दोन त्रुटी आढळल्या आहेत. पहिली त्रुटी 132.0.6834.83/8r पेक्षा जुन्या आवृत्त्या वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी समस्या निर्माण करू शकतो, तर दुसरी त्रुटी 132.0.6834.110/111 पेक्षा जुन्या आवृत्त्या वापरणाऱ्या वापरकर्त्यांना प्रभावित करतो. यामुळे युजर्सवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

CERT-In ने सांगितलं आहे की गुगल क्रोमच्या या त्रुटींमुळे हॅकर्स युजर्सची संवेदनशील माहिती चोरू शकतात आणि ते सिस्टमच्या सुरक्षेलाही बायपास करू शकतात. हे वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी तसेच संस्थांसाठी धोकादायक आहे. या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स सिस्टममधून डेटा चोरू शकतात. हॅकर्स वेब पेजच्या मदतीने या प्रणालींमध्ये प्रवेश मिळवू शकतात आणि नंतर ते त्यांच्या फायद्यासाठी युजर्सचा डेटा चोरून त्याचा वापर करू शकतात.
या त्रुटींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी, CERT-In ने सर्व वापरकर्त्यांना Chrome ची आवृत्ती अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, आवश्यक सुरक्षा पॅच लागू करण्यास सांगितले आहे. वापरकर्त्यांनी नियमितपणे Chrome आणि इतर ॲप्स अपडेट करत राहावे असा सल्लाही दिला जातो. यामुळे तुम्हाला नवीन फीचर्सचा फायदा तर मिळतोच पण तुम्ही अशा त्रुटींपासून सुटका मिळवू शकता. त्यामुळे सर्वात आधी जे युजर्स त्यांच्या लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मॅकबुकवर गुगल क्रोमचा वापर करत आहेत, त्यांनी या ब्राउझरचं लेटेस्ट वर्जन इंस्टॉल करणं गरजेचं आहे.
हेही वाचा :
अमेरिका पुन्हा WHO मध्ये सामील होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले संकेत
आशा भोसले यांच्या नातीला डेट करतोय Mohammad Siraj? फोटो व्हायरल
“…यांच्या सत्तेवर उद्या लोक थुंकतील”; मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा महायुती सरकारवर संताप