iPhone 13 वर मिळत आहे जबरदस्त ऑफर, 128GB मॉडेल स्वस्तात खरेदी करण्याची संधी
Apple iPhone खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी(new launch) एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही iPhones खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. सध्या iPhone 13 वर जबरदस्त ऑफर मिळत आहे. नेमकी काय आहे ही ऑफर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…
iPhone 13 कंपनीने 2021 मध्ये लॉन्च केला होता. हा थोडा जुना आयफोन(new launch) आहे, पण आजही त्याची मागणी जोरदार आहे. याचे एक मोठे कारण म्हणजे त्यात उपलब्ध असलेले जबरदस्त फीचर्स. तुम्हीही बऱ्याच दिवसांपासून आयफोन स्वस्त होण्याची वाट पाहत असाल, तर आता तुमच्याकडे पैसे वाचवण्याची उत्तम संधी आहे. iPhone 13 मध्ये तुम्हाला पॉवरफुल प्रोसेसरसह फ्लॅगशिप लेव्हल कॅमेरा सेटअप मिळेल. या फोनद्वारे तुम्ही तुमचा फोटोग्राफीचा छंदही पूर्ण करू शकता.
ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ग्राहकांना Apple iPhone 13 स्वस्तात खरेदी करण्याची संधी देत आहे. iPhone 13 Amazon वर 59,900 रुपयांना लिस्ट करण्यात आता आहे. ही किंमत 128GB मॉडेलसाठी आहे. सध्या Amazon वर या मॉडेलवर 17 टक्क्यांची सूट दिली जात आहे. या ऑफरद्वारे तुम्ही 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत हा फोन खरेदी करू शकता. फ्लॅट डिस्काउंटसह तुम्ही फक्त 49,499 रुपयांमध्ये iPhone 13 खरेदी करू शकता.
Amazon फ्लॅट डिस्काउंटसह मजबूत एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तर तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये 27,550 रुपयांची मोठी बचत करू शकता. मात्र ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या कंडिशनवर अवलंबून आहे.
कंपनीने iPhone 13 मध्ये 6.1 सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. याच्या डिस्प्लेमध्ये तुम्हाला HDR10, Dolby Vision, 800 nits ची पीक ब्राइटनेस मिळेल. डिस्प्लेमध्ये सेफ्टीसाठी सिरॅमिक शील्ड ग्लास देण्यात आला आहे. Apple ने या प्रीमियम फोनवर A15 Bionic चिपसेट दिला आहे. यामध्ये तुम्हाला 4GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी बेस मॉडेलच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 12+12 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
हेही वाचा :
तिकीटावरुन वाद.. धावत्या बसमध्ये प्रवाशाचा कंडक्टरवर चाकू हल्ला
वर्ल्डकपआधीच भारतासाठी गुड न्यूज; ‘सिक्सर किंग’ युवराज सिंह…
मविआ उमेदवाराकडून अजित पवारांना वाकून नमस्कार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण