इस्रायली महिलेशी हमासच्या बाप-लेकाचे राक्षसी कृत्य; आधी वडिलांनी मग लेकाने बलात्कार केला.

हमासचे सैनिक असलेल्या जमाल आणि अब्दल्ला या बाप-लेकांनी इस्रायली महिलेला (women) बंदी बनविले होते. त्या महिलांबरोबर त्यांनी काय केलं, याचा कबुलीजबाब त्यांनी नुकताच दिला.

इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलच्या सीमेत घुसून दीड हजाराहून अधिक इस्रायली नागरिकांचा बळी घेतला होता. त्याच्या उत्तरादाखल इस्रायलकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. तेव्हापासून इस्रायल पॅलेस्टाईनवर सतत हल्ले करत आहे. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातील काही भीषण घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. इस्रायलने हमासच्या काही हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते. यापैकी जमाल हुसैन अहमह रादी (वय ४७) आणि त्याचा मुलगा अब्दल्ला (वय १८) यांनी चौकशीदरम्यान अनेक धक्कादयाक खुलासे केले. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये घुसखोरी केल्यानंतर हमासने महिलांना कसे लक्ष्य केले, याचे धक्कादायक वर्णन या बापलेकांनी केले.

इस्रायल डिफेन्स फोर्सने पॅलेस्टाइनमधून हमासच्या हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. डेली मेल या वृत्त संकेतस्थळाने याबाबतची माहिती दिली आहे.

चौकशीदरम्यान जमालने सांगितले की, इस्रायल-गाझा सीमेवर असलेल्या किबुत्झ नीर या परिसरातील एका घरातून इस्रायली महिलेचा किंचाळण्याचा आणि रडण्याचा आवाज येत होता. आम्ही त्या घरात शिरलो आणि त्या महिलेवर बलात्कार केला. मी त्या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली, बंदूक दाखवून तिच्यावर बलात्कार केला, असे जमालने सांगितले.

हेही वाचा :

महापालिकेने दर्शवला धोक्याचा डेंजर झोन, पुरग्रस्तांसाठी पूर्वसूचना

कोल्हापूरच्या राजापूर बंधाऱ्यावर तगडा पहारा; प्रशासनावर ही वेळ का आली?

9 वी शिक्षण झालेल्या युवकाचा कारले शेतीचा प्रयोग, लाखो रुपयांच्या कमाई