सोनं स्वस्त झालं की महागलं? २४ कॅरेट सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

सोनं स्वस्त झालं की महागलं? २४ कॅरेट सोन्यासाठी किती पैसे सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने चढ उतार पाहायला मिळत आहे.(expensive)अशातच मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. शनिवारी देखील हीच स्थिती कायम असून, भारतात सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी ६६० रुपयांची वाढ झाली असून, आता त्याची किंमत ₹१,००,०४० रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे सोनं पुन्हा एकदा ₹१ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार, हे निश्चित.

शनिवारी सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळाली. २२ कॅरेट सोन्याच्या दरात ₹६०० रुपयांची वाढ झाली असून, त्यासाठी ₹९१,७०० रुपये मोजावे लागतील. तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात ₹४९० रुपयांची वाढ झाली आहे आणि १० ग्रॅमसाठी ₹७५,०३० रुपये मोजावे लागणार आहेत.

कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार एवढं मात्र नक्की. (expensive)दरम्यान, सोन्यासह चांदीच्या दरानेही उच्चांकी गाठली. आज भारतात १ किलो चांदीच्या दरात २,१०० रूपयांनी वाढ झाली आहे. १ किलो चांदीसाठी १,१६,००० रूपये मोजावे लागतील. त्यामुळे चांदीनेही १ लाखांचा टप्पा पार पाडला आहे.भारतात सोन्याची किंमत आतंरराष्ट्रीय बाजारातील दर, आयात शुल्क अन् कर, रूपये आणि डॉलरमधील दर, मागणी आणि पुरवठा याच्यातील समतोल, या व अशा विविध गोष्टीवर आधारीत सोन्याच्या दरात बदल केले जाते. भारतात सोनं फक्त गुंतवणुकीसाठी नसून, सणासुदीच्या काळात आवश्य खरेदी केली जाते. (expensive)यामुळे सोन्याच्या दरातील बदलाचा थेट परिणाम लोकांवर होतो.मोजावे लागणार?

हेही वाचा :