हातकणंगले : बॅलेट पेपरवर लक्ष द्या, राजू शेटटींच्या कार्यकर्त्यांना सूचना

प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणी वेळेचे मतदान याकडे देखील बारकाईने(instructions) लक्ष ठेवा. त्यामध्ये फेरफार आढळल्यास तात्काळ हरकत घ्या अशा सक्त सूचना, राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.लोकसभेच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चांगलीच तयारी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून  निवडणुकीला सामोरे गेले आहेत.

महाविकास आघाडीतून लढण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केल्यानंतर या मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी, महायुतीचे खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली.जातीय समीकरणे आणि मत विभाजनाचा प्रमुख फॅक्टर हाच या मतदारसंघाचा खासदार ठरवणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उद्या होणाऱ्या निकालाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

उद्या होणारी मतमोजणी मतदारसंघात नसल्याने त्यांना कोल्हापूर मतदारसंघात जावे लागणार (instructions)आहे. त्या दृष्टीनेच स्वाभिमानी ने तयारी केली असून 84 मतमोजणी प्रतिनिधींना आज विशेष सूचना देण्यात आले आहेत.

आज सायंकाळी सहा वाजता उचगाव येथील सरस्वती हॉल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आणि 84 मतमोजणी प्रतिनिधींचा मेळावा होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडून कार्यकर्त्यांना विशेष सूचना देण्यात आले आहेत. उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी 84 मतमोजणी प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना सूचना देता वेळी डोळ्यात तेल घालून प्रत्येक मतमोजणीकडे लक्ष द्या. बॅलेट पेपर मोजत असताना त्यावर बारीक लक्ष ठेवा. प्रत्यक्षात झालेले मतदान आणि (instructions)मतमोजणी वेळेचे मतदान याकडे देखील बारकाईने लक्ष ठेवा. त्यामध्ये फेरफार आढळल्यास तात्काळ हरकत घ्या अशा सक्त सूचना, राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.मुक्कामाची सोय, बूथनिहाय आकडेवारीहातकलंगले लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. शिवाय उद्या होणारी मतमोजणी ही कोल्हापूर शहरात नजीक असणाऱ्या राजाराम तलाव येथे होणार असल्याने कार्यकर्त्यांची कोणतीच गैरसोय होऊ नये याची काळजी स्वाभिमाने शेतकरी संघटनेने घेतली आहे.

हेही वाचा :

अमूल दुधाच्या दरात वाढ, आजपासून मोजावे लागणार इतके पैसे!

पाणीकपात आहे अंघोळ नको करु पत्नीच्या सल्ल्याने पती खवळला रागाच्या भरात केलं

‘खासदारकी’ला वारं बदलताच सांगलीकरांचं पुढचं ‘टार्गेट’ ठरलं?