बैलासमोर गेला अन् असं काही केलं की बैलाने शिंगावर उचलले अन्…; पाहा VIDEO
सोशल मीडियावर(socila media) दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी चित्र-विचित्र तर कधी मजेशीर असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी जुगाड, कधी स्टंट तर कधी भांडणांचे असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच मजेशीर डान्स रिल्स तसेच खाण्याशी संबंधित याशिवाय प्राण्यांशी संबंधित देखील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच तुम्ही ऐकले असेल की एखाद्या प्राण्याला तुम्ही त्रास दिल्याशिवाय सहसा तो प्राणी आपल्यावर हल्ला करत नाही. माणसांप्रमाणेच मुके प्राणी देखील आपल्याला जीव लावतात.
मात्र, अलीकडे प्राण्यांशी गैरवर्तनाचे प्रकार वाढले आहेत. विशेषत: दारुच्या नशेत लोक प्राण्यासमोर हिरोगिरी करायला जातात आणि काहीतरी भलतेचं होऊन बसते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर(socila media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. याआधी देखील असा प्रकार घडला होता. या व्हिडिओमध्ये एका माणसाला बैलाशी मस्ती करणे मगागात पडले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की, एका बैलाला फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेले आहे. तसेच त्याच्या आजूबाजूला अनेक गावकरी अनेक गावरकरी उभे आहेत. त्याच वेळी अचानक एक माणूस तिथे येतो आणि बैलासमोर डान्स करु लागतो. तसेच बैल देखील डान्स करु लागतो. तो माणूस अतिशय उत्साहात डान्स करत असतो. अचानक तो बैलाच्या वेसणाला पकडतो आणि डान्स करु लागतो. यामुळे अचानक बैल उधळतो आणि त्या माणसाला शिंगांवर उचलून जोरात आदळतो. त्या व्यक्तीच्या वागण्यावरुन असे वाटते की त्याने दारु पिली असावी.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @its_me_jo1 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, बैल म्हणेल आ बैल मुझे मार, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, बैलाला गाणं आवडलं नाही वाटतं. तसेच अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे याबाबक अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या या व्हिडिओने सर्व सोशल मीडियावर हसा पिकला आहे.
हेही वाचा :
या जिल्हामध्ये भाज्यांचे दर घटले..
सलमान मला मारायचा ऐश्वर्या रायच्या वक्तव्याने बाॅलिवूडमध्ये खळबळ
58 रुपयांपासून BSNL चे 5 स्वस्त प्लॅन्स, स्वस्त प्लॅन्स जाणून घ्या