काळीज पिळवटून टाकणारी घटना; रागाच्या भरात आईने 9 महिन्याच्या बाळाला छतावरून फेकलं

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका 27 वर्षीय महिलेने रागाच्या(anger) भरात आपल्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला छतावरून फेकून दिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून तिची कसून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना शनिवारी कृष्णा नगर परिसरात घडली. अंजू देवी असे या आरोपी महिलेचे नाव आहे. ती तिची बहीण मनिषा हिच्यासोबत माहेरी राहत होती. शनिवारी या दोन बहिणींमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले.
दोन्ही बहिणींमधील वाद विकोपाला गेला आणि रागाच्या(anger) भरात अंजूने आपल्या नऊ महिन्यांच्या मुलाला दुमजली घराच्या छतावरून खाली फेकून दिले. यामध्ये बाळाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजू देवीचा प्रेमविवाह झाला होता. ती गेल्या दोन वर्षांपासून आपल्या माहेरी राहत होती. तिची मोठी बहीण मनिषा देखील गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यासोबतच राहत होती.
बलियाचे पोलीस अधीक्षक ओमवीर सिंह यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि आरोपी अंजू देवीला ताब्यात घेतले. मयत बाळाची आजी शोभा देवी यांच्या तक्रारीवरून अंजू देवीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि आरोपी महिलेची कसून चौकशी करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून एका आईनेच आपल्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :
प्रजासत्ताक दिनानिमित्त Google चं खास डूडल
निराशाजनक बातमी! 26 जानेवारीप्रमाणे 2025 मध्ये ‘या’ हक्काच्या सुट्ट्याही रविवारीच आल्यात
अजित पवारांच्या निकटवर्तीयांने नागरिकाला उचलून आपटलं; डोक्याला व गुडघ्याला जखम