कोल्हापुरात मान आणि मत कोणाला? लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला
कोल्हापूर लोकसभेसाठी राज्यात सर्वाधिक चुरशीने मतदान झालं आहे.(assembly) करवीर विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे.कोल्हापूरच नव्हे, तर अवघ्या राज्याचे नव्हे, तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार कोण होणार? याचा फैसला 4 जून रोजी होणार आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे शाहू महाराज आणि शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक यांच्यात थेट सामना आहे. सात मे रोजी झालेल्या मतदानात कोल्हापूर लोकसभेला 71 टक्के मतदानाची नोंद झाल्याने वाढलेला टक्का कोणाला झटका देणार? याचीही उत्सुकता आहे.
करवीरमध्ये सर्वाधिक मतदान, पण पी. एन. पाटील हयात नाहीत
करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील नेतृत्व करत होते. मात्र, 19 मे रोजी बाथरुममध्ये पडल्यानंतर चार दिवस त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरु होता. 23 मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यामुळे काँग्रेसला निष्ठावंत शिलेदार हरपल्याने मोठा झटका बसला आहे. दुसरीकडे, संजय मंडलिक यांच्यासाठी करवीरमधून माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी या ताकद लावली आहे. करवीरमध्ये 78.89 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात कोल्हापूर शहर आणि उपनगरे सामावली गेली असून आणि नजीकची खेडी सुद्धा या दोन्ही मतदारसंघांमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा चुरशीने मतदान झाल्याचे दिसून आले.(assembly) कोल्हापूर उत्तर मध्ये 64.54 टक्के मतदानाची नोंद झाली, तर कोल्हापूर दक्षिण मध्ये 69.80 टक्के मतदानाची नोंद झाली.
कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?
- कोल्हापूर दक्षिण – आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेस
- कोल्हापूर उत्तर – आमदार जयश्री जाधव, काँग्रेस
- करवीर – स्वर्गीय पी. एन. पाटील, काँग्रेस
- राधानगरी भुदरगड – आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेना शिंदे गट
- कागल – आमदार हसन मुश्रीफ, अजित पवार गट
- चंदगड – आमदार राजेश पाटील, अजित पवार गट
राधानगरी भुदरगड मतदारसंघातील एकूण मतदान 66.68 टक्के झालं आहे. मतदारसंघ निहाय विचार करता चंदगडमध्ये अजित पवार गटाचे राजेश पाटील आमदार आहेत. कागलमध्ये हसन मुश्रीफ आमदार आहेत. करवीरमध्ये काँग्रेसचे पी. एन. पाटील आमदार आहेत. कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव काँग्रेसच्या आमदार आहेत. कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील काँग्रेसचे आमदार आहेत, तर राधानगरी-भुदरगडमध्ये शिवसेना शिंदे (assembly)गटाचे आमदार प्रकाश आबिटकर आहेत. त्यामुळे या विद्यमान आमदारांनी आपापल्या उमेदवारांसाठी किती ताकद लावली आहे आणि त्याचं मताधिक्य कोण किती देणार? याची उत्सुकता आहे.
दोन्हीकडून ताकदीने प्रचार
कोल्हापूर लोकसभेसाठी करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्याने कोल्हापूरच्या राजकारणाचा कल बदलून गेला होता. त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक महायुतीचे उमेदवार होते. संजय मंडलिक यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरातील तपोवन मैदानामध्ये आयोजित करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या एक महिन्यात तब्बल चार वेळा कोल्हापूरचा दौरा करत कोल्हापूर आणि हातकणंले या दोन्ही मतदारसंघांसाठी जोडण्या केल्या. कोल्हापुरातील आजी-माजी नगरसेवक, साखर कारखाने, गोकुळ ते सहकारी संस्थापर्यंत अनेकांशी थेट संपर्क साधत संजय मंडलिक यांच्यासाठी प्रयत्न केले आहेत.
त्यामुळे या सर्व जोडण्याचा परिणाम किती होतो हे पाहावं लागणार आहे. दुसरीकडे शाहू महाराजांच्या प्रचाराची संपूर्णतः जबाबदारी कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याच खांद्यावर होती. शिवशाहू निर्धार सभा गांधी मैदानात शाहू महाराजांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली. या सभेसाठी इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते. या सभेमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे यांची सुद्धा उपस्थिती होती. महाविकास आघाडीच्या अनेक छोट्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा मतदारसंघात शाहू महाराजांचा प्रचार केला आहे. कोल्हापूरसाठी छत्रपती शाहू घराणे हा अत्यंत नाजूक मुद्दा असल्याने त्याचा प्रभाव मतदानामध्ये दिसून आल्याची चर्चा आहे.
2019 सालचा निवडणूक निकाल – (Kolhapur Lok Sabha Constituency 2019 Result)
पक्ष | नाव | मिळालेली मते |
शिवसेना | संजय मंडलिक | 749,085 |
एनसीपी | धनंजय महाडिक | 4,78,517 |
वंचित आघाडी | अरुण मोहन माळी | 63,439 |
हेही वाचा :
अमूल दुधाच्या दरात वाढ, आजपासून मोजावे लागणार इतके पैसे!
पाणीकपात आहे अंघोळ नको करु पत्नीच्या सल्ल्याने पती खवळला रागाच्या भरात केलं
‘खासदारकी’ला वारं बदलताच सांगलीकरांचं पुढचं ‘टार्गेट’ ठरलं?