दुसऱ्या मजल्याच्या छतावर बाळ अडकलेच कसे? आई सोशल मीडियावर झाली ट्रोल, सहन न झाल्यानं स्वतःलाच संपवलं

सोशल मीडियावरुन दररोज अनेक धक्कादायक प्रकार समोर येत असतात. (social media)त्यातच पुन्हा एकदा चैन्नईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चेन्नईमधील एका बाळाच्या रेस्क्यूचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

सोशल मीडियावरुन दररोज अनेक धक्कादायक प्रकार समोर येत असतात. त्यातच पुन्हा एकदा चैन्नईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चेन्नईमधील एका बाळाच्या रेस्क्यूचा व्हिडिओ व्हायरल झाला होता,ज्यात बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील प्लास्टिकच्या छतावर हे अडकले होते मात्र त्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी मोठ्या शिताफीने त्या बाळाचे प्राण वाचवले होते. सोशल मीडियावर तेव्हा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा…तोच..तो व्हिडिओ.. तुम्हाला आठवला का?

चेन्नईतील या झालेल्या अपार्टमेंटमध्ये धक्कादायक प्रकारानंतर बाळ तिथं कसे(social media) पोहचले. या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले होते शिवाय बाळाच्या आईला अनेक प्रश्नांचा सामनाही करावा लागला असून निष्काळजीपणामुळे तिला अत्यंत ट्रोल केले जात होते. संबंधित घटना दिनांक २८ एप्रिल रोजी घडली होती. मात्र या घटनेला काही दिवसांचा काळ उलटला होता संपूर्ण प्रकरण शांत झाले असे जरी वाटले तरी ते काही झाले नव्हते. नागरिकांनी वाचवलेल्या बाळाच्या आईने १८ मे रोजी राहत्या घरी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

२८ ला काय घडलं ?

चेन्नईतील एका ही धक्कादायक घटना घडली होती. या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीवरील प्लास्टिकच्या छतावर ते लहान बाळ अडकले होते. बाळ अडकले असताना ते खूप(social media) रडत होते तर दुसरीकडे सर्वजण बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्या घटनेमुळे त्या ब्लिडिंगमध्ये गोंधळाचे वातावरण झाले होते. बाळाला झेलण्यासाठी काही नागरिक बिल्डिंगच्या खाली बेडशीट घेऊन उभे होते. जेणे करुन बाळ खाली पडले तर त्याला झेलता येईल. मात्र एका व्यक्तीने खिडकीतून बाहेर येऊन त्या बाळाला छतावरुन खाली काढले होते.

एप्रिलनंतर काय घडलं ?

चेन्नईमध्ये घडलेल्या घटनेत बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नागरिंकानी बऱ्याच वेळाच्या प्रयत्नानंतर त्या बाळाला वाचवले होते. त्यानंतर बाळाच्या आईवर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले. बाळ छतावर पोहचले कसे? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आला. बाळाच्या आईला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. यामुळे तिला मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण झाले. ती नैराश्येत होती. या संपूर्ण प्रकरणानंतर तिच्यावर उपचादरदेखील सुरु होते, असे सांगण्यात आले.

मीडिया वृत्तानुसार, या घटनेनंतर बाळाची आई तिच्या आईवडिलांकडे राहायला गेली. परंतु आजूबाजूचे लोक तिला खूप प्रश्न विचारायचे. त्यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. शनिवारी तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हेही वाचा :

‘रावण पण हिंदुत्ववादी’, मतदानाच्या दिवशी राज ठाकरेंवर खूप बोचरी टीका

मोठी बातमी! बारावीच्या निकालाची तारीख ठरली, बोर्डाने दिली महत्वाची अपडेट

मोठी बातमी! EVM मशिनला हार घातला, नावाच्या चिठ्ठ्या वाटल्या; शांतीगिरी महाराजांसह ४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल