‘मला ड्रामा करायचा नव्हता, पण समोरच्या व्यक्तीने… तेव्हाच ठरवलं की खड्ड्यात गेले सगळे’, युजवेंद्रचा धनश्रीवर निशाणा?

काही महिन्यांपूर्वी धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचं नातं अखेर संपुष्टात आलं .मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये याप्रकरणी सुनावणी झाली आणि त्यांचा घटस्फोट झाला. मुंबई: डान्सर आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट (Divorce)झाला. धनश्रीनं भारताचा स्टार क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबत लग्नगाठ बांधली होती. पण लग्नाच्या दोन वर्षातच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या. आता युजवेंद्रनं त्याच्या आणि धनश्रीच्या घटस्फोटावर भाष्य केलं. मला कोणताही तमाशा करायचा नव्हता, पण समोर एक गोष्ट घडली, तेव्हा विचार केला की, खड्ड्यात गेलं सगळं, बास्स आता आणि घटस्फोट घेतला… असं चहलनं या मुलाखतीत म्हटलंय.

 

युजवेंद्र चहलने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटाबद्दल (Divorce)मनमोकळी उत्तरं दिली. घटस्फोटाच्या सुनावणीच्या दिवशी मुंबईतल्या कोर्टात जेव्हा चहल आणि धनश्री आले तेव्हा चहलने घातलेल्या टी-शर्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यानंतर यावर लिहिलेल्या वाक्याची बरीच चर्चा झाली होती.यावर आता चहलनं मौन सोडलं आहे.चहलला टीशर्टबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की, मला कोणताही ड्रामा , कोणताही तमाशा करायचा नव्हता. मला एक मेसेज द्यायचा होता, जो मी टीशर्टद्वारे दिला. खरं तर सुरुवातीला असं काही करण्याचा किंवा स्टेटमेंट देण्याचा विचार नव्हता, पण समोरच्या व्यक्तीकडून काहीतरी घडल्यामुळं प्रतिक्रिया देण्याची गरज भासली, असं चहलनं यावेळी सांगितलं.

 

मी काहीच न बोलण्याचा निर्णय घेतला होता, पण समोरून काही गोष्टी घडल्या. माझा असा काहीच विचार नव्हता. मग म्हटलं आता बास्स झालं… पुरे झालं… खड्ड्यात गेले सगळे, मला आता कोणाचीच पर्वा नाही. मी कधीच कोणालाही शिवीगाळ केली नव्हती, केली नाही…मला फक्त एक मेसेज द्यायचा होता तो मी दिला.चहल आणि धनश्रीनं डिसेंबर २०२० मध्ये लग्न केलं होतं. दोघांचही लव्ह मॅरेज होतं. चहलनं धनश्रीला लग्नाची मागणी घातली होती. पण लग्नाच्या काहीच वर्षांनी दोघांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. दोघांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये घटस्फोटासाठी (Divorce)अर्ज केला आणि मार्चमध्ये त्यांना घटस्फोट मंजूर झाला. चहल सध्या आरजे महवशला डेट करत असल्याच्या अफवा आहेत.

हेही वाचा :