इचलकरंजी पश्चिम महाराष्ट्रातील ड्रग्जचे मुख्य केंद्र इचलकरंजी बनतय का? पुन्हा ‘मिशन झिरो ड्रग्ज’, घातक मेफेड्रॉन जप्त

कोल्हापूर जिल्ह्यात ‘मिशन झिरो ड्रग्ज’ मोहिमेअंतर्गत शहापूर पोलिसांनी मोठी (drugs)कारवाई करत १३४.०४ ग्रॅम ‘एमडी’ असा ६ लाख ७३ हजार २०० रुपये किमतीचा मेफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. कोरोची गाव हद्दीत साईनाथ वजन काट्याजवळ सापळा रचून ऋषभ राजू खरात वय ३०, रा. लोकमान्यनगर, कोरोची याला अटक करण्यात आली. मागील आठवड्यात प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा आणि आता या एमडी ड्रग्ज कारवाईने शहरात खळबळी उडाली आहे.

१८ जुलै रोजी रात्री ११.५६ वाजण्याच्या सुमारास पंचगंगा साखर कारखाना ते कोरोची रोडवरील(drugs) साईनाथ वजन काट्याजवळ आरोपी विक्रीसाठी एमडी ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती गोपनिय बातमीदारामार्फत पोलीस नाईक सतिश लक्ष्मण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचत आरोपीला पकडले. त्याच्याकडून १३४.०४ ग्रॅम मेफेड्रॉन, २५०० रुपये रोख, आणि ५०० रुपयांचे साहित्य असा एकूण ६,७३,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.‘मिशन झीरो ड्रग्ज’ मोहिमेंतर्गत गावभाग पोलिस व पोलिस उपअधीक्षक पथकाने शहरातील नशेच्या अड्ड्यांवर रविवारी कारवाई केली आणि प्रतिबंधित मेफफेंटर्मीन सल्फेट या इंजेक्शन विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून एकूण दोन लाख ३६ हजार ९६४ किमतीचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली आहे.

मुख्य संशयित संग्राम अशोकराव पाटील वय २९, रा. श्रीपादनगर, सचिन सुनील मांडवकर २५, रा. यशवंत कॉलनी अभिषेक गोविंद भिसे २५ रा. लालनगर, सर्व इचलकरंजी असे त्यांची नावे आहेत.(drugs)तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांना मिळालेल्या माहिती आधारे संग्राम पाटील याच्यासाठी श्रीपादनगर भागात सापळा रचण्यात आला.

हेही वाचा :