चिकन खात असाल तर आत्ताच व्हा सावध; ‘बर्ड फ्लू’ ने टेंशन वाढवलं

राज्यात बर्ड फ्लूने(Bird flu) पुन्हा एकदा डोके वर काढल्याने खळबळ उडाली आहे. काही वर्षांपूर्वी बर्ड फ्लूमुळे कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला होता. आता पुन्हा एकदा लातूर, ठाण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोल्ट्री व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिक धास्तावले आहेत. अनेक ठिकाणी ग्राहक चिकन खाणे टाळत असल्याने, हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ढालेगाव येथील एका पोल्ट्री फार्ममधील तब्बल ४२०० कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अवघ्या दोन ते तीन दिवसांतच हा प्रकार घडल्याने, मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. सुरुवातीला हा प्रकार काय आहे, हेच पोल्ट्री मालकाच्या लक्षात आले नाही. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत, मृत कोंबड्यांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
दुसरीकडे, लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात ६० कावळ्यांचा गूढरीत्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बर्ड फ्लूमुळेच(Bird flu) कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, पोल्ट्री व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :
IPL 2025 पूर्वी KKR ला मोठा धक्का! रणजी मॅचमध्ये स्टार खेळाडूला दुखापत
करदात्यांना मिळणार दिलासा; इतक्या लाखांचं उत्पन्न करमुक्त होणार?
फिरायला गेलेल्या पर्यटकांवर अचानक कोसळला डोंगर, तलावात पुढे जे घडले… Video Viral