कोल्हापूरमध्ये कारने चौघांना चेंडूसारखं हवेत उडवलं! 3 ठार Video

 कोल्हापूर शहरातील एका भीषण अपघाताच व्हिडीओ(crash) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहरातील सायबर चौकात हा अपघात घडला. या अपघातात कारने चौघांना चिरडल्याची माहिती मिळली आहे. यात चालकासह 3 ठार झाले असून 5 जखमी झाले आहेत. तर 3 दुचाकी आणि एका कारचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलंय. झालेल्या या अपघातामुळे चौकात वाहतुकींची मोठी कोंडी झाली होती. तुम्ही जर कमकूवत मनाचे असाल तर कृपया हा व्हिडीओ पाहू नका.

कसा घडला अपघात?
शहरातील सायबर चौकात दुपारच्या सुमारास (crash)काही लोक दुचाकीवरुन रस्ता ओलांडत होत्या. यावेळी सर्व वाहनांचा वेग कमी होता. प्रत्येकजण जागा मिळेल तशी वाहने पुढे नते होते. इतक्यात एका भरधाव वेगाने आलेल्या कारने दोनतीन दुचाकींना जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील लोक काही फूट फेकले गेले. जोराची धडक बसल्याने काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात एक चिमुरडी वाचल्याचे पाहायला मिळाले. अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मात्र, तिघांना मृत घोषित केलं आहे. राजारामपुरी पोलीस आणि शहर वाहतूक(crash) शाखेचे पोलीस वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता.

हेही वाचा :

अमूल दुधाच्या दरात वाढ, आजपासून मोजावे लागणार इतके पैसे!

पाणीकपात आहे अंघोळ नको करु पत्नीच्या सल्ल्याने पती खवळला रागाच्या भरात केलं

‘खासदारकी’ला वारं बदलताच सांगलीकरांचं पुढचं ‘टार्गेट’ ठरलं?