महाभारतात महिलांना दिलेल्या शापाचा परिणाम पुरूषांना लागतोय भोगावा

महिलांच्या पोटात काहीही राहत नाही असे म्हणतात. पण असं का बोलतात कुणास ठाऊक? (women)आणि या म्हणीचा महाभारताशी काय संबंध? काही समजुतींनुसार, युधिष्ठिराच्या शापाचा परिणाम महिला आजही भोगत आहेत परंतु आधुनिक काळात याचे अनेक अर्थ असू शकतात आणि सकारात्मक दृष्टिकोनातूनही पाहिले जाऊ शकतात.

तुम्ही अनेकदा लोकांना असं म्हणताना ऐकले असेल की स्त्रियांना कोणतेही रहस्य सांगू नये कारण त्या बोलक्या असतात आणि त्यांच्या पोटात काहीही राहत नाही. आता याचे कारण काहीही असो, पण याच्याशी संबंधित एक प्रसंग महाभारतात सापडतो. ज्यामध्ये युधिष्ठिराने स्त्री जातीला शाप दिला होता की स्त्रिया कधीही कोणापासून काहीही लपवू शकत नाहीत.

आता युधिष्ठिराने असा शाप का दिला, हे जाणून घेण्यासाठी हा महाभारताचा प्रसंग (women)समजून घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर बदलत्या काळानुसार महिलांसाठी म्हटल्या जाणाऱ्या या वाक्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. कारण या वाक्याकडे नेहमीच नकारात्मक भावनेने पाहिले जाते. पण कधी कधी कारण सकारात्मकही असते

कर्णाच्या मृत्यूशी निगडीत आहे घटना

महाभारत युद्ध संपल्यानंतर माता कुंती कर्णाला मांडीवर घेऊन रडत होती. तेवढ्यात पांडव तिथे पोहोचतात आणि त्यांची आई शत्रूच्या मृत्यूवर अश्रू का ढाळत आहे हे त्यांना समजत नाही. तेव्हा युधिष्ठिराने कुंतीला विचारले की ती आपल्या शत्रूच्या मृत्यूमुळे का व्यथित आहे? तेव्हा कुंतीने सांगितले की कर्ण हा तिचाच मुलगा आहे.

रहस्य समजल्यावर युधिष्ठीराने शाप दिला

कर्णाच्या जन्माविषयी कुंतीने पांडवांना सांगितले की, दुर्वास ऋषींनी प्रसन्न होऊन तिला मंत्र व वरदान दिले की या मंत्राने ती ज्या देवाचे आवाहन करेल त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होईल. त्यावेळी कुंतीला मंत्राची शक्ती तपासून पहायची होती आणि तिने यावेळी सूर्यदेवाला आवाहन केले. यातूनच कुंतीलां सूर्यपुत्र कर्ण झाला. पण लोकांच्या लज्जेच्या भीतीने तिने या बालकाला नदीत सोडून दिले. त्यानंतर तिचा पांडूशी विवाह झाला आणि पांडवांचा जन्म झाला. एवढे मोठे सत्य कुंतीने सर्वांपासून लपवून ठेवले. तेजस्वी आणि सूर्याचा पुत्र असूनही कर्णाला आयुष्यभर अपमान सहन करावा लागला. अशा स्थितीत कर्णाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर युधिष्ठिराचा राग अनावर होतो आणि तो संपूर्ण स्त्री जातीला शाप देतो की यापुढे कोणतीही स्त्री आपल्या पोटात काहीही लपवू शकणार नाही.

आजही स्त्रिया लपवतात गोष्टी

असे मानले जाते की महाभारतातील याच शापामुळे महिलांना काहीही(women) लपवता येत नाही, आता यात किती तथ्य आहे हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा विषय आहे. पण ज्याप्रमाणे त्याकाळी समाजाच्या भीतीपोटी कुंतीने कर्णाविषयीचे सत्य लपवून ठेवले होते, त्याचप्रमाणे आजही काही गोष्टी स्त्रियांकडून लपवून ठेवल्या जातात. अनेक स्त्रिया घरातील आपल्या समस्या, दु:ख, वाईट परिस्थिती उघड करत नाहीत.

यशस्वी होण्यासाठी सिक्रेट ठेवतात

तुम्ही अनेकदा ऐकले असेल की यशस्वी व्यक्ती आपले प्लानिंग कोणाला सांगत नाही तर शांतपणे आणि हळू हळू यशाकडे वाटचाल करत असते. हीच गोष्ट त्या स्त्रियांना देखील लागू होते, ज्या आपले ध्येय लपवून ठेवतात आणि सक्षम होण्यासाठी त्यावर काम करतात. आपण काय, कधी आणि कसे करणार आहोत हे हे ती सांगत नाही, तर ते साध्य करून दाखवते.

कधी कधी सांगणे महत्त्वाचे असते


‘स्त्रियांच्या पोटात गोष्टी पचत नाहीत’ ही म्हण समाजाच्या आकलनानुसार नकारात्मक भावना देते, पण ती सकारात्मक मानली तर असे दिसून येते की गोष्टी शेअर करणे महत्त्वाचे आहे. कारण गोष्टी सांगण्याने प्रश्न सुटतात. म्हणूनच लोक म्हणतात की एखाद्याने आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या पाहिजेत जेणेकरून एकदा समस्या कळली की त्यावर उपाय सापडेल, जोपर्यंत समस्या कळत नाही तोपर्यंत उपाय कसा सापडेल.

हेही वाचा :

कोल्हापूर: इन्स्टाग्रामवरची ‘भाईगिरी’ पडली महागात

कोल्हापुरात छत्रपती विरुद्ध मंडलीक चुरशीची लढत

Viral Video : बापरे! लग्नात फायर गनची शायनींग पडली महागात